कन्या राशीच्या मुलावर प्रेम करणं हे अजिबात सोप नाही. होय, आम्ही अजिबात खोट बोलत नाही, हे खरच खूप अवघड आहे. तुमच्या प्रत्येक गोष्टीत चूक शोधून ते योग्य करण्याची त्यांची प्रवृत्ती, विक्षिप्त स्वच्छतेच्या सवयी, हायपोकॉन्ड्रिया आणि बाथरुम शेअर करण्यास नकार देणे यातील कोणतीही एक बाब कन्या राशीच्या मुलामध्ये आढळते.
जर त्याचे माझ्यावर प्रेम आहे तर मग तो आमच्यात संबंध निर्माण झाल्यानंतर अंघोळ का करतो ? हा नेमका कोणत्या प्रकारचा प्रियकर आहे, जो सतत मला मी कशी चुकीची आहे ? ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो. अशी कन्या राशीच्या मुलांबद्दल तक्रार आपल्याला ऐकायला मिळते.
मात्र, तुम्ही काळजी करु नका. आजच्या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला कन्या राशीच्या पुरुषांसंदर्भात काही महत्वाच्या टिप्स देणार आहोत. तसेच कन्या राशीचे पुरुष त्यांचे प्रेम दर्शवण्यासाठी ज्या अवघड पद्धती किंवा ज्या 7 गोष्टींद्वारे प्रेम दर्शवतात. त्याबद्दल देखील आम्ही सांगणार आहोत.
idiva
1. तो सतत तुमच्यावर टीका करत असेल तर याचा अर्थ असा नाही की, त्याला तुम्ही पसंत नाहीत. तो तुम्हाला परफेक्ट होण्यामध्ये मदत करु शकत नाही.कन्या राशीचे लोक असे मानतात की, टीका करणे अर्थात चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्या योग्य करण्यास सांगणे. यामध्ये समोरच्या व्यक्तीमध्ये एक प्रकारची सुधारणाच होत असते. मकर राशीच्या लोकांप्रमाणेच त्यांना वाटते की, आपल्यावर प्रेम करणारी महिला ही परफेक्टच असावी. त्यामुळे, ते त्यांच्या उच्च अपेक्षांबाबत क्लिअऱ असतात आणि मोकळ्या पणाने बोलतात.
त्यामुळे काहींना अशी टीका करणारी माणसे आवडत नसतील. कदाचित त्यांना कन्या राशीचा व्यक्ती हा तापट आणि स्वार्थी देखील वाटू शकतो. ते एवढे ही रागीट नसतात. परंतु, त्यांच्या सवयींवर कोणतेही निर्बंध लावता येऊ शकत नाही.
idiva
2. तो भावनाशून्य वाटतो कारण तो नाटकी पुरुष नाही. परंतु, याचा अर्थ असा नाही की त्याला काही भावनाच नाहीत.कन्या राशीच्या तीक्ष्ण, मस्त आणि अलिप्त व्यक्तिमत्त्वात काहीतरी खूप आकर्षक आहे. यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. तथापि, कन्या राशीतील पुरुषांमध्ये असलेला मेलोड्रामा आणि भावनिकतेच्या अभावामुळे बहुतेक लोक दुखावले जातात आणि भावनांच्या कमतरतेमुळे ते अनेकदा चुकतात. त्यांच्याकडे प्रेम दाखवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत आणि तो त्याच्या भावनांबद्दल तितका स्पष्ट देखील नसतो.
3. हा माणूस पुस्तकांमध्ये असणारा रोमँटिक पुरुष नाही. परंतु, याचा अर्थ असा नाही की तो तुमच्यावर प्रेम करत नाही.कन्या राशीचे पुरुष तूळ राशीच्या पुरुषांप्रमाणे तुमच्यासाठी कविता लिहिणार नाहीत किंवा तापट वृश्चिक राशीप्रमाणे तुमचे मन उडवणार नाहीत. ते तुम्हाला सिंह राशीच्या व्यक्तीप्रमाणे कॅंडल नाईट डिनरच्या डेटमधून पळवून लावणार नाहीत. जर तुम्ही रोमान्सची तुलना प्रेमाशी करत असाल तर कन्या राशीचा पुरुष हा तुमच्यासाठी नाही. त्याचे प्रेम हे स्थिर आणि व्यवहारिक आहे.
idiva
4. तो त्याचे प्रेम शब्दांतून किंवा सेक्सद्वारे व्यक्त करत नाही तर तो मदत आणि प्रत्यक्ष वागण्यातून त्याचे प्रेम दाखवतो.कर्तव्यदक्ष असलेला कन्या राशीचा पुरुष तुम्हाला सेवा आणि मदतीच्या माध्यमातून त्याचे प्रेम व्यक्त करेल. जर तो तुम्हाला भेटायला घरी येत असेल तर तो तुमची रुम साफ करुन देतो. त्याला तुमची काळजी आहे, म्हणून तो हे करत असतो. शिवाय, तो तुमचे आयुष्य सुधारण्याचा देखील प्रयत्न करतो.
जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा तो तुमच्यासाठी सूप ऑर्डर करतो. जेव्हा तुम्ही खूप थकलेल्या असाल तेव्हा तो तुमचं डोकं दाबून देतो, अशा कितीतरी माध्यमांतून तो तुमची मदत करत असतो. हा माणूस असा आहे की, ज्याला असे वाटते की एखाद्यावरील प्रेम दाखवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना मदत करणे होय.
idiva
5. कामासाठी जास्त वेळ खर्च करणे त्याच्यासाठी नॉर्मल आहे. कारण, त्याचा जॉब ही त्याची पहिली प्रायोरिटी आहे.अनेक लोक हा विचार करतात की, जो व्यक्ती कामासाठी जास्त वेळ खर्च करतो, जो घरापासून दूर राहतो, ही त्या व्यक्तीच्या अनास्थेची, निरुत्साहाची आणि चिटींग करणारा अशी ओळख असते, असा काहींचा समज असतो. कन्या राशीच्या बाबतीत हे क्वचितच खरे आहे. त्यांना कामामध्ये आनंद मिळतो. ऑफिसमधील वातावरण हे त्यांना त्यांच्या झोनमध्ये असल्यासारखे त्यांना वाटते.
या राशीच्या पुरुषांपैकी काहींना प्रत्यक्ष कामाचा आनंदही मिळतो. परंतु, एक गोष्ट स्पष्ट आहे, त्यांना काम करण्यापासून जर परावृत्त केले तर त्याचा त्यांना तिरस्कार वाटतो. अशावेळी त्यांना त्यांचे नाते आणि त्यांची नोकरी यापैकी एकाची निवड करावी लागेल, असे सांगितले जाते.
6. तो स्वत: हून मदत घेणार नाही, परंतु त्याला मदतीची गरज भासते.कन्या राशीचे पुरुष सामान्यपणे संवाद साधण्यामध्ये उत्तम असतात., परंतु ते नम्र आणि लाजाळू असल्यामुळे त्यांना इतर लोकांना काही विचारण्यास संकोच वाटू शकतो. तो तुमच्यासाठी आनंदाने सर्वकाही करेल. हा माणूस प्रशंसेची किंवा आभार व्यक्त करावेत अशी मागणी किंवा अपेक्षा करत नाही. परंतु, त्याला त्याचे सतत चिंताग्रस्त असलेले मन शांत करण्यासाठी त्याला कुणीतरी हवे असते.
idiva
7. तो तुमच्या वागण्या बोलण्यातील बारीक गोष्टी नोटीस करेल आणि तो तुमच्या मूडशी किती सुसंगत आहे हे सिद्ध करेल.काही इतर पुरुष कन्या राशीसारखे तुमच्यातील छोटे-मोठे बदल लक्षात घेतील, जो तुमचा मूड, तुमचा टोन, तुमची देहबोली, तुमची अभिव्यक्ती आणि बरेच काही या सर्व गोष्टींचे निरीक्षण करेल. स्वत:मध्ये रमणारा असूनही तो जोडीदाराची काळजी करणारा असेल. शिवाय, आपल्या जोडीदारामध्ये होत असलेल्या बदलांचे बारीक निरीक्षण करण्यात तो पटाईत असतो. इतर पुरुषांपेक्षा त्याला जोडीदाराशी निगडीत असलेल्या गोष्टींमध्ये जास्त रस असतो.