डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
Webdunia Marathi December 29, 2024 01:45 PM

Dr. Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आज दिल्लीतील निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. माजी पंतप्रधानांचे पार्थिव प्रथम काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आले.


येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी त्यांना अखेरचा निरोप देऊन आदरांजली वाहिली. नंतर डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव निगम बोध घाटावर आणण्यात आले .

मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आता थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे पार्थिव निगम बोध घाटावर आणण्यात आले आहे. माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येने काँग्रेस नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी,

अमित शहा आणि राजनाथ सिंह निगम बोध घाटावर पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निगम बोध घाटावर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही निगम बोध घाटावर पोहोचून माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.