Aaj Che Havaman (आजचे हवामान): राज्यात अनेक भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता, IMD सांगितला अंदाज
Aaj Che Havaman (आजचे हवामान): महाराष्ट्रातील अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहणे आवश्यक आहे. अनेक भागांमध्ये तर गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात खान्देश, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 27 ते 29 डिसेंबर या काळात मेघगर्जना, गारपीटीसह पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सध्या मुंबईसह अनेक शहरांना प्रदूषण, धुक्याचा सामना करावा लागतो आहे. त्यातूनही यामुळे हवामानात प्रचंड बदल आहे. त्यात थंडीही महाराष्ट्रात जोरदार आहे.
नाशिक, पुण्यात काय परिस्थिती?ईशान्यकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून येणारे वारे यांचा मेळ मध्य भारतावर होत असल्याने पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड या भागात वादळी पाऊस होऊ शकतो. राज्यातील पुणे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, नागपूर जिल्ह्यात आणि अकोला, अमरावती बुलढाणा, वर्धा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी गारपीट देखील होईल, अशी शक्यता वर्तविली आहे. पुण्यात गारपिटीचीही अंदाज आहे.
वातावरणात सातत्याने बदलपश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाब क्षेत्र पश्चिमेकडे सरकत हळूहळू निवळत आहे. पश्चिमी चक्रावात, राजस्थान आणि परिसरावर असलेले चक्राकार वारेतसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसाला पोषक हवामान निर्माण झाले. त्यामुळे हवामानात झपाट्याने बदल होतो आहे.
मुंबईत हवेचा दर्जा खालावलागेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा सातत्याने खालावू लागला आहे. शहरातील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीत नोंदला जात आहे. मुंबईचा हवा निर्देशांक बुधवारी 191 इतका होता. काही भागांत अतिवाईट तर काही भागांत वाईट हवेची नोंद झाली. बोरिवली येथे बुधवारी सायंकाळी अतिवाईट हवेची नोंद झाली. तेथे हवा गुणवत्ता निर्देशांक 304 नोंदवला गेला. त्याचबरोबर देवनार, कांदिवली, मालाड, नेव्ही नगर, कुलाबा, शिवडी, वरळी परिसरातही वाईट हवेची नोंद झाली. वातावरणातील घातक पीएम 2.5 आणि पीएम 10 धुलीकणांचे प्रमाणही वाढले आहे.
मराठवाड्यात हवामान कसे?मराठवाड्यात हवामानातील बदल दिसून येत आहेत. चालू थंडीचा हंगाम असूनही 30 डिसेंबरपासून महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन अपेक्षित आहे. संपूर्ण महिनाभर हवामानातील बदल दिसून येतात.