Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादीच्या रूपाली पाटील ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल
Saam TV December 29, 2024 04:46 PM
Beed News: राष्ट्रवादीच्या रूपाली पाटील ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल

राष्ट्रवादीच्या रूपाली पाटील ठोंबरे विरोधात गुन्हा दाखल

बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

जितेंद्र आव्हाड यांचे विरोधात केल्याने गुन्हा दाखल

रूपाली पाटील यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल

जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील वादग्रस्त chat रुपाली पाटील यांनी केल होत ट्विट

Pune News: रश्मी शुक्ला यांनी कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त केली पाहणी

पुण्यातील कोरेगाव भिमा येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतला बंदोबस्ताचा आढावा

भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याचे आयोजन

पुणे पोलीस आयुक्तालय येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शुक्ला यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

सुरक्षा यासह कोरेगाव भिमा येथे येणाऱ्या नागरिकांची पार्किंग व्यवस्था, इतर सोयी सुविधांचा सुद्धा यावेळी आढावा घेण्यात आला

Shirdi News: सलग सुट्ट्या आल्याने शिर्डीत साईभक्तांची मोठी गर्दी

सलग सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत साईभक्तांची मोठी गर्दी

आज रविवार असल्याने साई मंदिरासह शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेत

साई संस्थानचे भक्तनिवास, खासगी हॉटेल्स, पार्किंग हाऊसफुल झालेत

साईभक्तांचे दर्शन सुकर व्हावे यासाठी साई संस्थानकडून विविध उपाययोजना करण्यात आल्यात

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.