Plane Crash: 175 प्रवासी असलेलं विमान कोसळलं, आतापर्यंत 85 जणांचा मृत्यू
Times Now Marathi December 29, 2024 04:46 PM

South Korea Plane Crash: दक्षिण कोरियातील एका विमान अपघातात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. जेजू एअरचे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवरून घसरले आणि क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. या विमानात एकूण 181 लोक होते, ज्यात 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. न्यूज एजन्सी योनहॅपच्या मते, दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विमान धावपट्टीवरून घसरले आणि क्रॅश झाले, ज्यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे. मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या बचावकार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

हे विमान थायलंडहून परतत होते

समोर आलेल्या माहितीनुसार, जेजू एअरचे हे विमान थायलंडहून परतत होते. दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर उतरताना विमान घसरले आणि भिंतीवर आदळले. भिंतीवर आदळताच विमानाने पेट घेतला. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. विमानाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी 32 फायर इंजिन आणि हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले होते. अपघातानंतर संपूर्ण परिसर काळ्या धुराच्या दाट ढगांनी भरला होता.




ढिगाऱ्याखालून दोन जणांना जिवंत बाहेर काढले

प्राथमिक माहितीनुसार, लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय अग्निशमन यंत्रणेने सांगितले की, अपघातानंतर लागलेली आग विझवण्यात आली आहे. विमानाच्या ढिगाऱ्यातून प्रवाशांना बाहेर काढले जात आहे. सध्या बचाव मोहिमेदरम्यान दोन जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. त्यात एक प्रवासी आणि एक पायलट आहे.




योनहाप न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, विमान धावपट्टीवरून घसरले आणि भिंतीवर धडकले. दक्षिण-पश्चिम कोस्ट विमानतळावर स्थानिक वेळेनुसार सकाळी 9:07 वाजता ही घटना घडली. दक्षिण कोरियाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष चोई सुंग-मोक यांनी मदत आणि बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, 25 डिसेंबर रोजी अझरबैजान एअरलाइन्सचे जेट कझाकस्तानच्या अकताऊजवळ क्रॅश झाले होते, त्यात 67 पैकी 38 जणांचा मृत्यू झाला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.