नवी दिल्ली : नव्या वर्षाचा सूर्य सामान्यांसाठी खुशखबर घेऊन आला आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरची किंमत कमी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सामान्यांना चांगलाच फायदा होणार आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी हा निर्ण घेतला आहे.
ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 19 किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. आज म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून व्यावसायिक गॅस सिलिंडर 14.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी 1 मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. त्यानंतर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात अद्याप कपातीचा निर्णय घेण्यात आलेला नाही.
ऑईल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला गॅस सिलिंडरचे दर नव्याने ठरवतात. यावेळीदेखील 1 जानेवारी रोजी सिलिंडरचे नवे दर लागू करण्यात आले आहेत. या निर्णयानुसार 1 जानेवारी 2025 पासून दिल्लीमध्ये 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅस सिलिंडर 1804 रुपयांना, मुंबईत 1756 रुपये, चेन्नईमध्ये 1966 रुपये तर कोलकाता शहरात 1911 रुपयांना मिळेल. याआधी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर दिल्लीमध्ये 1818.50 रुपये होता. दिल्लीमध्ये आता घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 803 रुपये, कोलकातामध्ये 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये तर चेन्नईत 818.50 रुपये आहे.
साधारण सहा महिन्यांनंतर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. याआधी गेल्या वर्षाच्या जुलै महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सलग वाढ करण्यात आली होती. या काळात दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात एकूण 172.5 रुपयांची वाढ झाली होती.
दरम्यान, यावेळीदेकील ऑईल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मार्च 2024 मध्ये घरुगुती गॅस लिंडरच्या दरात शेवटची कपात करण्यात आली होती. या काळात घरगुती गॅस सिलिंडर 100 रुपयांनी स्वस्त झाला होता. याआधी 30 ऑगस्ट 2023 मध्ये घरगुती गॅस सिलिंडर 200 रुपयांनी स्वस्त करण्यात आले होते.
हेही वाचा :