Latest Marathi News Updates : माजी महापौर नंदेकुमार घोडिले आणि त्यांच्या पत्नी अनिता घोडिले यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
esakal January 04, 2025 06:45 AM
माजी महापौर नंदेकुमार घोडिले आणि त्यांच्या पत्नी अनिता घोडिले यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

शिवसेना UBT नेते आणि छत्रपती संभाजी नगरचे माजी महापौर नंदेकुमार घोडिले आणि त्यांच्या पत्नी अनिता घोडिले यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

BPSC विरोधात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाटण्यात मशाल रॅली काढली

BPSC विरोधात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाटण्यात मशाल रॅली काढली आहे.

Pune News: शरद मोहोळ हत्येचा बदला घेऊ पाहणाऱ्या २ जणांना पुणे पोलिसांनी केली अटक

शरद मोहोळ हत्येचा बदला घेऊ पाहणाऱ्या २ जणांना पुणे पोलिसांनी केली अटक

पुणे पोलिसांनी उधळला "त्या" तरुणांचा प्लॅन

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने २ जणांना पिस्तुलासह केली अटक

Mahakumbh News: महाकुंभ 2025 साठी सहा प्रकारचे वाहन ई-पास जारी

महाकुंभ 2025 साठी सहा प्रकारचे वाहन ई-पास जारी केले जाणार आहेत.

Delhi News: शेतकरी नेते राकेश टिकैत आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले

शेतकरी नेते राकेश टिकैत आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

Mumbai Live : कॉपीमुक्त परीक्षेसाठी सीसीटीव्ही, व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार

दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्तपणे राबविण्यासाठी छत्रपती संभाजीनरच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून तयारी सुरू झाली आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही आहेत, त्यांनाच परीक्षा केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय केंद्रावरील हालचाली टिपण्यासाठी व्हिडिओ शूटिंग केले जाणार असून, त्यासाठी शिक्षण विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.

Pune live : चाकणमध्ये सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं शरद पवारांच्या हस्ते अनावरण

पुणे जिल्ह्यातील चाकण इथं सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. यावेळी छगन भुजबळ देखील उपस्थित होते. दोघेही एकाच मंचावर आल्यानं राजकीय चर्चाही रंगली आहे. पण भाषणात आता शरद पवार काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Live: मंत्रालयात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं

क्रांतिज्योती सावित्रीबाईफुले यांच्या जयंतीदिनी मंत्रालयात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

Solapur Live: सम्राट अशोक शिक्षण संकुलात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला मुक्ती दिन, बालिका दिन व पोलीस रायजिंग डे साजरा...!

सोलापूर: सम्राट अशोक युवक मंडळ शिक्षण संकुलामध्ये सम्राट अशोक मराठी विद्यालय, यशोधरा प्रशाला, सोलापूर व सलगर वस्ती पोलीस स्टेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला मुक्ती दिन, बालिका दिन' तसेच 'पोलीस रायजिंग डे' साजरा करण्यात आला.

Jitendra Awada Live: जितेंद्र आव्हाडांच्या पत्रकार परिषदेत घुसले स्पेशल ब्रँचचे पोलीस

- आव्हाडांच्या पत्रकार परिषदेचे पोलिसांनी केले चित्रीकरण

- माझ्या घरात कसे काय घुसलात? म्हणत आव्हाडांनी पोलिसांना झापलं

- माझ्यापेक्षा वाल्मिक कराडवर वॉच ठेवावा- आव्हाड

- माझ्यावर वॉच ठेवून सरकारला काय साधायचे आहे- आव्हाड

भारताकडून बोलिव्हियाला एकूण 16 टन मानवतावादी मदतीची पहिली खेप.

भारताकडून बोलिव्हियाला एकूण 16 टन मानवतावादी मदतीची पहिली खेप. अग्निशमन उपकरणं, प्रथमोपचार किट, औषधं आणि इतर उपयुक्तता यांचा समावेश

मंत्री रामदास आठवले यांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबियांची घेतली भेट

आरोपी विशाल गवळी राहत असलेली इमारत धोकादायक ,केडीएमसी ने नोटीस दिल्याची मंत्री रामदास आठवले यांची माहिती

इमारत जमीनदोस्त करण्याची मागणी केडीएमसी आयुक्तांकडे मागणी केली

पीडित कुटुंबियांच्या पाठीशी आमचा पक्ष उभा राहणार

Ambegaon Live: निरगुडसर मध्ये बिबट्या जेरबंद

आंबेगाव येथील वळसेमळ्यात बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना गुरुवारी (ता. २) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.

निरगुडसरजवळील वळसेमळा परिसरात दिवसा व रात्री बिबट्याचा वावर वाढल्याने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली होती. त्यानुसार वळसेमळा या ठिकाणी मंगळवारी (ता. ३१) पिंजरा लावण्यात आला.

त्यानंतर गुरुवारी रात्री साडेसात वाजता बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची घटना घडली.

Satara Live: महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याच्या आणि विचारांच्या प्रसारासाठी शासन सदैव प्रयत्नशील असेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

-सावित्रीबाई फुले यांचं स्मारक लवकरात लवकर विस्तारित स्वरूपात तयार करायला राज्य सरकारचं प्राधान्य असेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

- महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रसार करण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील असेल.

Satara Live : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्सव’ कार्यक्रमाला उपस्थिती

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्सव’ कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीचा मार्चमध्ये मुहूर्त

मार्च महिन्यामध्ये भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

Pune Live Updates: पुण्यात दुचाकी विकणाऱ्या शोरुम यांना ग्राहकांना हेल्मेट देण्याची आता सक्ती
  • पुण्यात दुचाकी विकणाऱ्या शोरुम यांना ग्राहकांना हेल्मेट देण्याची आता सक्ती

  • नवीन दुचाकी विकताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणे आता अनिवार्य

  • पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सर्व शोरूम मालकांना आदेश

  • रस्त्यावरील होत असणाऱ्या सततच्या अपघातांमुळे होणाऱ्या जीवितहानी रोखण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा निर्णय

  • दोन हेल्मेट देणे असणार बंधनकारक

Savitribai Phule Jayanti Live Updates: गावागावात प्रतिमापूजन आणि सावित्रीबाईंना अभिवादन

ठिकठिकणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी. गावागावात प्रतिमापूजन आणि सावित्रीबाईंना अभिवादन.

PM Narendra Modi Live: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिवादन

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले. त्यांनी म्हटले आहे की महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रात मुहूर्तमेढ सावित्रीबाई फुले यांनी रोवली. त्यांचे कार्य आजही प्रेरणा देते.

Devendra Fadnavis: महाराष्ट्र परकीय गुंतवणुक आकर्षित करण्यात अग्रेसर - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटले आहे की राज्य परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात अग्रेसर रहिले आहे. गेल्या ६ महिन्यात वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के गुंतवणूक झाली आहे. ६ महिन्यात १ लाख २३६ कोटी गुंतवणूक झाली आहे.

Live : सानपाडा डिमार्ट जवळ फायरिंग; ५-६ राउंड फायर करुन आरोपी फरार

पाच ते सहा राऊंड फायरिंग करून आरोपी फरार

एक जण जखमी..

सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल

दोन आरोपींकडून फायरिंग.. फायरिंग करून बाईक वरून आरोपी फरार

Pune Live : नवीन वर्षात पुणे मेट्रोची धमाकेदार सुरुवात, दोन लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी केला प्रवास

पुणे मेट्रो ची नवीन वर्षात धमाकेदार सुरुवात

वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी २ लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी केला प्रवास

पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर १ जानेवारी रोजी २,०४,९५७ प्रवाशांनी केला प्रवास

पुणे व पिंपरी-चिंचवडकरांनी मोठ्या संख्येने घेतला पुणे मेट्रो सेवेचा लाभ

पर्पल मार्गावर (पीसीएमसी ते स्वारगेट) वर १,०२,७८३ तर ॲक्वा मार्गावर (वनाझ ते रामवाडी) १,०२,१७४ प्रवाशांची नोंद

Nashik Live : छगन भुजबळ आणि शरद पवार आज एकाच व्यासपीठावर...

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात आज शरद पवार आणि छगन भुजबळ सहभागी होणार आहेत. यासंदर्भात छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. पवार साहेब आणि मी एकत्र येणार हे खरे आहे, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभे केले आहे. - शरद पवार आणि मला आमंत्रित केले, फुलेंचा जिथे असतो त्या कार्यक्रमला मी जातो, असे ते म्हणाले.

Nagpur Live : नागपूर एम्सला यकृत प्रत्यारोपणाची मंजुरी, अवयवांच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना दिलासा

- नागपूर एम्सला यकृत प्रत्यारोपणाची मंजुरी मिळाल्याने अवयवांचे प्रतीक्षेत असणाऱ्यांना रुग्णांना नव वर्षात मोठा दिलासा

- महाराष्ट्रात राज्यातील शासकीय रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण करणारे नागपूर हे पहिले रुग्णालय ठरणार अशी शक्यता आहे

- एकट्या नागपूर विभागात यकृत प्रत्यारोपणासाठी 200 च्या वर वेटिंग लिस्ट आहे...

- अनेकजण मृत्यूच्या दाढेत अडकले असून या सगळ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे

- यापूर्वी पासून बोनमॅरो, हार्ट, मूत्रपिंड यांचे प्रत्यारोपण केले जात आहे...

- त्यामुळे आता यकृत प्रत्यारोपणमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

Satara News Live : सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी जयंतीनिमित्त जय्यत तयारी

नायगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी होत आहे

मोठी जय्यत तयारी नायगाव मध्ये करण्यात आली

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर इतर मंत्री मोठ्या संख्येने उपस्थित राहणार

Live : केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान आज नाशिक दौऱ्यावर

देशाचे कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आज नाशिक दौऱ्यावर

- नाशिकच्या त्रंबकेश्वर मंदिरात जाऊन घेणार दर्शन तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात शेतकऱ्यांशी साधणार संवाद

- शिवराज सिंह चव्हाण यांच्यासोबत राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे देखील असणार उपस्थित

- देशाचे आणि राज्याचे कृषिमंत्री आज एकत्र येत असल्याने कांदा निर्यात शुल्कासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता

- कांदा निर्यात शुल्क पूर्णपणे हटवण्याची गेल्या काही दिवसांपासून होतेय मागणी

- याच संदर्भात आज दोन्ही कृषी मंत्र्यांमध्ये चर्चा होऊन काही सकारात्मक निर्णय होतो का? शेतकऱ्यांचे लक्ष

Traffic Police LIVE : वाळूच्या एनआरबी चौकात वाहतूक पोलिसाला दोन तरुणांची मारहाण

छत्रपती संभाजीनगर : वाळूच्या एनआरबी चौकात वाहतूक पोलिसाला दोन तरुणांनी मारहाण केली. कर्तव्य बजावत असताना तरुणांनी शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तरूण दारू पिलेले असल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती. लाथाबुक्यांनी मारहाण होत असताना खाली पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना नागरिकांनी दोघांच्या तावडीतून सोडवले. वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला. अंकुश रामदास आहेर आणि लक्ष्मण नामदेव खंबाट अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखनाथ मंदिरातील गोशाळेत गायींना चारला चारा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिरातील गोशाळेत गायींना चारा चारला.

President Draupadi Murmu LIVE : राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते आज कॅन्सर रुग्णालयाचे उद्घाटन

बेळगाव : केएलई डॉ. संपतकुमार एस. शिवणगी कॅन्सर रुग्णालयाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त शुक्रवारी (ता. ३) राष्ट्रपतींचे विशेष विमानाने बेळगावात आगमन होणार आहे. उद्या (ता. ३) सायंकाळी चार वाजता रुग्णालय उद्घाटन समारंभ होईल.

Railway Station LIVE : दिल्लीत पसरली थंडीची लाट, रेल्वे स्थानकावर गाड्यांना पोहोचण्यास होतोय उशीर

दिल्ली : धुक्यामुळे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर अनेक गाड्यांना उशीर झाला असून शहरात थंडीची लाट पसरली आहे.

Principal Shridhar Herwade Passes Away LIVE : प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांचे निधन

इचलकरंजी : प्रख्यात साहित्यिक व विद्यावाचस्पती म्हणून ओळखले जाणारे उत्कृष्ट वक्ते, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व प्राचार्य श्रीधर शामराव हेरवाडे (वय ८७) यांचे काल दुपारी येथे निधन झाले. शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती होती. सायंकाळी पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन आज सकाळी ८.३० वाजता आहे. त्यांच्या मागे मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे.

CM Yogi Adityanath LIVE : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखनाथ मठात केले हवन

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथील गोरखनाथ मठात रुद्राभिषेक आणि हवन केले.

Dharwad Municipal Corporation LIVE : धारवाडला स्वतंत्र महापालिकेचा दर्जा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

बंगळूर : हुबळी-धारवाड महानगरपालिकेचे विभाजन करून स्वतंत्र धारवाड महानगरपालिकेच्या निर्मितीला गुरुवारी (ता. २) मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे आता हुबळी आणि धारवाड या दोन स्वतंत्र महानगरपालिका अस्तित्वात येणार आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी विधानसौध येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हुबळीपासून धारवाडला तत्काळ वेगळे करून महानगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Kurla Kuresh Nagar News : कुर्ला कुरेश नगरमध्ये धक्कादायक प्रकार, मुलीनेच केली आईची हत्या

कुर्ला कुरेश नगरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. कुर्ला कुरैश नगरमध्ये मुलीनेच आईची हत्या केली आहे. मुलीने ऑईवर चाकूने वार केल्याने आईचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी मुलीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

Weather Update LIVE : जानेवारी ते मार्च महिन्यांत देशात सरासरी इतका पाऊस, थंडी कमी राहणार

पुणे : जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशाच्या बहुतांशी भागात सरासरी इतका पाऊस (८८ ते ११२ टक्के) पडण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याने देशात थंडी कमी राहणार आहे.

Shooter Swapnil Kusale LIVE : ऑलिंपिक पदक विजेता नेमबाजपटू स्वप्नील कुसाळेला केंद्र शासनातर्फे अर्जुन पुरस्कार जाहीर

Latest Marathi Live Updates 3 January 2025 : पॅरिस ऑलिंपिकमध्ये दोन पदके पटकावणारी नेमबाज मनू भाकर, जगज्जेता बुद्धिबळपटू डी. गुकेश, भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग व पॅरा ॲथलिट प्रवीणकुमार या खेळाडूंची यंदाच्या प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड केली आहे. तर, ऑलिंपिक पदक विजेता नेमबाजपटू स्वप्नील कुसाळे याला केंद्र शासनातर्फे अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज राज्यभरात साजरी होत आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशाच्या बहुतांशी भागात सरासरी इतका पाऊस (८८ ते ११२ टक्के) पडण्याची शक्यता आहे. केएलई डॉ. संपतकुमार एस. शिवणगी कॅन्सर रुग्णालयाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त आज राष्ट्रपतींचे विशेष विमानाने बेळगावात आगमन होणार आहे. त्याचबरोबर राज्यात काही ठिकाणी गारपीट झाली आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.