नाताळ सणाच्या सुट्ट्या व सलग सुट्ट्या यामुळे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली आहे. शहरातील देवस्थाने व वटवृक्ष मंदिरात भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या पाठीपासून लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.
Nagpur Murder: छातीवर वार करून धावत्या ऑटोतून फेकून देत हत्याछातीवर वार करून धावत्या ऑटोतून फेकून देत हत्या केल्याची घटना उघडकीस आलीय....
मारेकरी मृतकाची ओळख जून पटली नसून हत्येचा गुन्हा दखल, धंतोली पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू
आरोपींनी ऑटो रिक्षातून कुंभार टोली परिसरात सुरवातीला चाकूने वार करून जखमी केले, त्यानंतर चालत्या ऑटोतून धक्का देऊन जखमीला फेकत पसार झाले...जखमीचा रक्तस्राव होऊन मृत्यू झाला...
मृतक हा 40 ते 45 वर्षाचा आहे. यात ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडलीय... मृताच्या खिशात पोलिसांना लोहगाव ते वाघोली असे प्रवासाचे तिकीट मिळाले....त्यावरून पुण्याचा रहिवासी असल्याचा संशय पोलिसांना व्यक्त केलाय...
पोलीस आरोपींचा शोध घेत हत्येमागचे कारण शोधत आरोपीचा शोध लावत आहे...
Paithan Live : भाजीपाल्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकला माल!पैठण तालुक्यातील पाचोडच्या आठवडे बाजारात भाजीपाल्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून दिला .
Pune Live: रायगडावरील श्री जगदीश्वर व श्री वाडेश्वर ही दोन वेगळी मंदिरेरायगडावर असलेल्या महादेव मंदिरांचा अभ्यास करताना दोन स्वतंत्र मंदिरांचा पुरावा समोर आला आहे. इतिहास संशोधक राज मेमाणे यांच्या संशोधनातून श्री जगदीश्वर आणि श्री वाडेश्वर महादेव ही दोन वेगवेगळी मंदिरे असल्याचे समोर आले आहे.
भारत इतिहास संशोधक मंडळात झालेल्या पाक्षिक सभेत राम मेमाणे यांनी त्यांचे संशोधन सादर केले. यावेळी ज्येष्ठ इतिहासतज्ञ पांडूरंग बलकवडे, मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, उपाध्यक्ष डॉ. बी.डी. कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार निकम यावेळी उपस्थित होते.
राज मेमाणे म्हणाले, रायगडावरील महादेवाचे मंदिर त्याच्या तटबंदीवर असलेल्या शिलालेखातील मजकुरावरून श्री जगदीश्वर महादेव या नावाने ओळखले जाते. पुणे पुरालेखागारातील पेशवेकालीन मोडी कागदपत्रांतून रायगडावर श्री वाडेश्वर महादेवाचे जीर्ण झालेले मंदिर होते आणि त्याचा जीर्णोद्धार इसवी सन १७८२ साली केला असा उल्लेख येतो. त्यावरून ज्येष्ठ इतिहास संशोधक श.ना. जोशी यांनी त्यावेळेस उपलब्ध झालेल्या कागदपत्रांतील मजकुरावरून असा तर्क मांडला होता कि, रायगडावरील महादेवाचे शिवकालीन मूळ नाव वाडेश्वर असावे आणि प्रस्तुत शिलालेखात गौरवार्थ म्हणून काव्यात त्याला जगदीश्वर म्हटले गेले असावे.
Pune: विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त पोलीस महासंचालकांनी घेतला बंदोबस्ताचा आढावापुण्यातील कोरेगाव भिमा येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतला बंदोबस्ताचा आढावा
भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याचे आयोजन
पुणे पोलीस आयुक्तालय येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शुक्ला यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
सुरक्षा यासह कोरेगाव भिमा येथे येणाऱ्या नागरिकांची पार्किंग व्यवस्था, इतर सोयी सुविधांचा सुद्धा यावेळी आढावा घेण्यात आला
Pune Live: पुण्यात भिंतीवर लावलेल्या रंगावरून वाद?पुण्यात भिंतीवर लावलेल्या रंगावरून वाद?
पुण्यात एका भिंतीवर हिरवा रंग देत चादर आणि फुलं चढवल्याचा प्रकार
पुणे शहरातील सदाशिव पेठेत हा प्रकार समोर
या घटनेची भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली दखल
पुणे शहरातच नाही, तर महाराष्ट्रसह इतर अनेक ठिकाणी हे प्रकार सध्या वाढले असल्याचा मेधा कुलकर्णी यांनी केला आरोप
आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष देऊया कृती करूया, भाजप खासदार यांचे आवाहन
मेधा कुलकर्णी यांची सोशल मीडिया पोस्ट
काल सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीमध्ये हिरवा रंग देऊन तिथे हार, फुले, अगरबत्ती लावून पूजा करण्यात आल्याचे व्हाट्सअप viral झाले. मी आज आवर्जून त्या ठिकाणी शहानिशा करण्यासाठी गेले. आधी खात्री करून घेतली आणि मग श्री संग्राम ढोले पाटील, संकेत मेहंदळे, यशपाल जाधव आणि श्री. दातेरे यांच्या समवेत हिरवा रंगावर भगवा रंग असा चढवला की मजा आली.
Pune: पुण्यात CNG दरांमध्ये पुन्हा वाढपुण्यात CNG दरांमध्ये पुन्हा वाढ
एमएनजीएलकडून रुपये 1.10 प्रति किलो सीएनजी दरवाढ
पुण्यातील CNG च्या दरात रुपये १.१० प्रति किलोची वाढ
ही दरवाढ जागतिक बाजारातील चढ-उतारांचा थेट परिणाम असल्याचे सांगितले जातं आहे
सी एन जी साठी आता नवीन किंमत ८९ रुपये प्रति किलो इतकी राहणार
सी एन जी जुनी किंमत ८७.९० प्रति किलो इटली होती
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यात सीएनजीचे नवीन दर ८९ रुपये प्रतिकिलोवर
Sanjay Rathod Live: संजय राठोड होणार पालकमंत्री?मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री डाॅक्टर अशोक ऊईके तसेच राज्यमंत्री इंद्रनील नाईक या तिन्ही मंत्र्यांना यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा राजकीयवर्तुळात सुरू असून जिल्ह्यातील जनताही पालकमंत्र्याची आतुरतेने वाट पाहत आहे.सध्या पालकमंत्र्याविनाच जिल्ह्याचा कारभार सुरूय आहेत.
Nana Patole Live: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोककाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले आहे.
आज दुपारी २ वा. सुकळी, ता. साकोली जि. भंडारा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.