एक-दोन नव्हे तर 16 सूर्योदय-सूर्यास्त पाहत सुनीता विल्यम्स यांनी केलं नवीन वर्षाचं स्वागत
GH News January 01, 2025 12:09 PM

नव्या वर्षाचं आगमन झालं आहे. संपूर्ण जगभरात नवीन वर्षाचा उत्साह पहायला मिळतोय. अवकाशातही नवीन वर्ष साजरं करण्यात आलं आहे. सध्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या अंतराळात आहेत. त्यांनी आणि त्यांच्या टीमने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) नवीन वर्ष साजरं केलं. विशेष म्हणजे ISS हे दर दहा मिनिटांनी पृथ्वीभोवती फिरतं. त्यामुळे अंतराळ स्थानकावरील सुनीता आणि त्यांचे सहकारी हे 16 सूर्योदय आणि 16 सूर्यास्त पाहू शकले. अंतराळ केंद्राने याबाबतची माहिती दिली आहे. सुनीता विल्यम्स या जून 2024 पासून बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानावर आहेत. त्यांना या मिशनचं ISS कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. हे मिशन फक्त आठ दिवसाचं होतं. परंतु सुनीता आणि त्यांची टीम अजूनही अवकाशात अडकले आहेत. सुनीता विल्यम्स यांच्यासोबत ॲलेक्सी ओव्हचिनिन, बुच विल्मोर, इव्हान वॅगनर, डॉन पेटिट, अलेक्झांडर गोर्बुनोव्ह आणि निक हेग हे देखील अवकाशात अडकले आहेत. सुनीता यांनी 2024 मधील बहुतेक सण अंतराळात राहूनच साजरे केले आहेत.

ISS ने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर फोटो पोस्ट करत लिहिलंय, ‘2024 हे वर्ष आज संपतंय. एक्स्पेडिशन 72 क्रू हे 16 सूर्योदय आणि सूर्यास्त पाहत नवीन वर्षाची सुरुवात करतील.’ विल्यम्स आणि बुच विल्मोर हे आता मार्चमध्ये परतण्याची अपेक्षा आहे. ते फेब्रुवारी 2025 मध्ये परतणार होते. परंतु SpaceX क्रू-10 मोहिमेत विलंब झाल्यामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

भारतीय मूळ असलेल्या सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकाही बुच विल्मोर यांनी 5 जून 2024 रोजी बोईंग कंपनीच्या स्टारलाइन स्पेसक्राफ्टच्या पहिल्या क्रू फ्लाइटमध्ये स्वार होऊन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक गाठलं होतं. 8 दिवसांच्या मिशनवर गेलेल्या स्टारलायनर यानात बिघाड झाल्याने दोघं अंतराळवीर यांच्या पृथ्वी वापसीला मार्च 2025 पर्यंत वेळ लागू शकतो असं म्हटलं जातंय. एवढे महिने स्पेस ट्रॅव्हल्स करुनही सुनीता विल्यम्स यांचं अंतराळ प्रेम जराही कमी झालेलं नाही. “या जागी मला आनंद मिळतो. मला इथं राहायला आवडतं,” असं त्या म्हणाल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.