Australia All Out But..चौथ्या कसोटीतील दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची आघाडी फलंदाजी स्वस्तात माघारी परतली. जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी मोगोमाग विकेट्स टाकल्या. मार्नस लाबुशेन व पॅट कमिन्सच्या जोडीने त्रास दिला, पण त्यांचीही भागीदारी ५७ धावांवर तुटली. पण नेथन लायन व स्कॉट बोलंडच्या जोडीने शेवटच्या विकेटसाठी भारताला हैराण केले. अंतिम १७.५ षटके दोघांनी ५५ धावांची नाबाद भागीदारी केली.
शेवटच्या विकेटसाठी जवजवळ भारताच्या सर्वच प्रमुख गोलंदाजांनी गोलंदाजी केली. पण लायन व बोलंड दिवस समाप्तीपर्यंत मैदानावर टीकून राहिले. दोघे ऑस्ट्रेलियाची आघाडी ३०० पार घेऊन गेले. भारताने शेवटच्या विकेटसाठी दोन रिव्ह्यू देखील गमावले. पण स्कॉट बोलंड व नेथन लायन भारतीय गोलंदाजांच्या जाळ्यात काही फसले नाहीत. बुमराहने देखील त्यांच्याविरूद्ध गोलंदाजी केली. पण त्यांनी बुमराहसमोर देखील त्यांनी उत्तम बचाव केला.
अखेर अंतिम षटकात बुमराहने टाकलेला चेंडू नेथन लायनच्या बॅटला लागून स्लिपमध्ये उभ्या असलेल्या केएल राहुलकडे गेला. चेंडू थेट जावून केएल राहुलच्या पायात बसला राहुलने पायानेच झेल केला. भारतीय संघ खूश झाला, अंतिम विकेट मिळाली आणि ऑस्ट्रेलिया ऑल आऊट झाली. पण पंचांना या चेंडूवर वॉर्मअप करावा लागला, कारण बुमराहचा पाय बॉलिंग क्रिजच्या बाहेर होता. पंचानी नो बॉलचा इशारा दिला आणि भारतीय संघाच्या पदरी निराशा पडली. भारताला ज्या विकेटची अत्यंत आवश्यकता होती. ती विकेट भारताच्या हातातून निसटली आणि बोलंड व लायन चौथ्या दिवशी नाबाद राहिले.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २२८ धावा उभारत ३३३ धावांची आघाडी घेतली आहे. ज्यामध्ये मार्नस लाबुशेनने ३ चौकारांच्या मदतीने १३९ चेंडूत ७० धावांची खेळी केली. कर्णधार पॅट कमिन्सने ९० चेंडूत ४१ धावा उभारल्या. सध्या नेथन लायन ५४ चेंडूत ४१ धावांवर नाबाद आहे. तर, स्कॉट बोलंड ६५ चेंडूत १० धावांवर नाबाद आहे.