बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभूत व्हावं लागलं. भारताला हा सामना जिंकण्याची संधी होती. मात्र त्यानंतर सामना ड्रॉ होण्याच्या स्थितीत आला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला बॅकफुटवर टाकलं आणि सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यासह मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर आता या मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना हा 3 जानेवारीपासून सिडनीत खेळवण्यात येणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज आणि टीम इंडियासाठी डोकेदुखी असलेला ट्रेव्हिस हेड याला 2025 वर्षातील पहिल्याच दिवशी मोठा झटका लागला आहे.
आयसीसीकडून दर बुधवारी क्रमवारी जाहीर करण्यात येते. त्यानुसार, आताही आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने फलंदाजांच्या क्रमवारीत हेडला पछाडलं आहे. यशस्वीने एका स्थानाने झेप घेत हेडला मागे टाकलं आहे.
यशस्वीने चौथ्या सामन्यातील दोन्ही डावात अप्रतिम खेळी केली होती. यशस्वीने दोन्ही डावात अर्धशतकी खेळी केली होती. यशस्वीची दोन्ही डावात शतकाची संधी हुकली. यशस्वीने पहिल्या डावात 82 तर दुसऱ्या डावात 84 धावा केल्या. तर जसप्रीत बुमराह याने ट्रेव्हिस हेडला दोन्ही डावात पद्धतशीर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. हेडला पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नाही. तर हेडला दुसर्या डावात फक्त 1 धावच करता आली. त्याचाच फटका हेडला बसला आहे. तर यशस्वीला फायदा झाला आहे.
यशस्वीने पाचव्या स्थानावरुन चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यशस्वीच्या खात्यात 854 रेटिंग पॉइंट्स आहेत. तर हेडची चौथ्या स्थानावरुन पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. हेडच्या खात्यात 780 रेटिंग पॉइंट्स आहेत.
कसोटी क्रमवारीत कोण कुठे?
पाचव्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, ट्रेव्हिस हेड (उपकर्णधार), जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर