New Year Travel : न्यू इयर सेलिब्रेशनसाठी मुंबईतील ही ठिकाणे आहेत बेस्ट
Marathi December 29, 2024 10:25 PM

2024 हे वर्ष आता संपायला आलं आहे. ३१ डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे आपण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हा दिवस साजरा करतो. या दिवशी सगळीकडे पार्टीचे खास आयोजन केले जाते. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आपण कुटूंब किंवा मित्रपरिवारासोबत कुठेतरी बाहेर जायचं प्लनिंग करतो. परंतु बुकिंग हाउसफूल असल्यामुळे आपल्याला कळत नाही,कोणत्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. आज आपण जाऊन घेऊयात, न्यू इयर सेलिब्रेशनसाठी मुंबईतील कोणत्या ठिकाणी जाऊ शकतो.

मुंबईत आपण बऱ्याच ठिकाणी जाऊ शकतो. या दिवसात मुंबईमध्ये एक वेगळाच उत्साह आणि आनंद आपल्याला पाहायला मिळतो. मुंबईत अशा बऱ्याच जागा आहेत, जिथे तुम्ही जाऊ शकता.

– जाहिरात –

मरीन ड्राइव्ह

मुंबईतील सर्वात लोकप्रिय ठिकाण म्हणजे, मरीन ड्राइव्ह. तुम्ही न्यू इयर सेलिब्रेशनसाठी या ठिकाणी जाऊ शकता. रात्रीच्या वेळी मरीन ड्राइव्ह खूप सुंदर आणि आकर्षक वाटते.

गेटवे ऑफ इंडिया

नवीन वर्षाचे स्वागत गेटवे ऑफ इंडियाला जाऊन देखील करू शकता. गेटवे ऑफ इंडियाला तुम्हाला खूप सुंदर व्हिएव पाहायला मिळेल.

– जाहिरात –

अलिबाग

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तुम्ही मुंबईच्या आसपास असलेले स्थळ म्हणजे अलिबाग येथे जाऊ शकता. तुम्ही येथे फॅमिलीसोबत तसेच मित्रांसोबत येऊन अलिबाग बीचवर फिरायला जाऊ शकता. याशिवाय अलिबाग मध्ये आल्यावर तुम्ही फक्त अलिबाग बीचच नाही तर इथे असलेले वरसोली बीच, कुलाबा किल्ला, मुरुड-जंजिरा किल्ला, उंधेरी किल्ला इत्यादी ठिकाणी देखील जाऊ शकता. जर तुम्हाला शांतता आणि बीच ची खूप आवड असेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.

कर्जत

मुंबईपासून काही अंतरावर असलेले अतिशय सुंदर प्रेक्षणीय ठिकाण म्हणजे, कर्जत. येथे तुम्हाला हायकिंग आणि रिव्हर राफ्टिंग करण्याची ही संधी देखील मिळेल. धबधबे आणि हिरवगार निसर्ग असं सुंदर दृश्य पाहायला मिळेल. तुम्ही बऱ्याच गोष्टी कर्जतला एक्सप्लोर करू शकता.

हेही वाचा : New Year 2025 : नववर्ष साजरे करण्याच्या अनोख्या पध्दती


संपादन : प्राची मांजरेकर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.