तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील सोनू हे पात्र साकारणारी अभिनेत्री नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. २८ डिसेंबर रोजी झील मेहताने थाटामाटात बॉयफ्रेंड कंटेन्ट क्रिएटर आदित्य दुबेशी लग्न केले आहे. सोशल मीडियावर झील मेहताने लग्न सोहळ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यावर चाहत्यांसह नेटकऱ्यांनी या कपलला वैवाहिक जीवनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
झील मेहताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, दोघेही लग्नाच्या गेटअपमध्ये दिसत आहे. झीलने लाल रंगाचा डायमंडने भरलेला लेहेंगा चोली परिधान केला आहे. तर आदित्यने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी घातली आहे. दोघांचाही लग्नसोहळ्यातील हा खास अंदाज आकर्षित करत आहे.
सोशल मिडिया पोस्टमध्ये झील म्हणतेय, या आधी मी कधीच इतकी खूश नव्हते. माझ्या आनंदाला पारावर उरला नाही असं ती म्हणतेय. तर पुढे आदित्य म्हणाला जेव्हा झील ही नवरी लूकमध्ये माझ्यासमोर चालत आली तेव्हा मला असं वाटलं की जणू १४ वर्षाच्या आमच्या रिलेशनशीपमध्ये मी १० वर्षे मागे गेलोय" अशातच झील आणि आदित्यचा आनंद गगनास मावेनासा झाला आहे.
झील ही प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतून कमालीची लोकप्रियता मिळवली. झीलने या मालिकेत सोनू भिडे हे पात्र साकारले होते. २०१२ पर्यंत झीलने मालिकेत काम केले यानंतर तिने वैयक्तिक कारणाने मालिका सोडली. मालिकेत आत्माराम भिडे यांची मुलगी सोनू याच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रेम मिळाले. आजही झील तारक मेहता मधील सोनू या नावाने प्रसिद्ध आहे.
झील मेहता सध्या काय करते?
झील मेहता ही एक मेकअप आर्टिस्ट आहे. झील तिच्या आईसोबत या प्रोफेशनमध्ये आहे. तिची आई हेअर स्टायलिस्ट आहे. झील सतत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना दिसते. स्टायलिश अंदाजातील विविध व्हिडीओ झील शेअर करते जे तिच्या चाहत्यांना देखील आवडतात.