भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5वी कसोटी: सिडनी कसोटीत भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना बांधून ठेवलं. परिणामी त्यांना 181 धावांच्या आत रोखण्यात भारताला यश आलं. 39 धावांवर 4 फलंदाज बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने चांगले पुनरागमन केले. त्यामुळे एकेकाळी ते भारताची धावसंख्या पार करतील असे वाटत होते. आणि त्यात भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहही मैदानाबाहेर गेला होता. यानंतरही भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत 185 धावा त्यांचा पहिला डाव गुंडाळला. टीम इंडियाला 4 धावांची आघाडी मिळाली.
लंच ब्रेकनंतर कर्णधार जसप्रीत बुमराहने एक षटक टाकले आणि नंतर मैदानाबाहेर गेला. बुमराहच्या बाहेर गेल्यानंतरही भारतीय गोलंदाजांचा आत्मविश्वास कमी झाला नाही. प्रसिद्ध कृष्णाने ॲलेक्स कॅरीला बॉलिंग देऊन ब्यू वेबस्टरसोबतची भागीदारी तोडली. दोघांनी 41 धावा जोडल्या होत्या. यानंतर पॅट कमिन्स चांगली फलंदाजी करत होता. नितीशकुमार रेड्डीने त्याची विकेट घेतली. दरम्यान, बेवस्टरने पदार्पणाच्या कसोटीतच अर्धशतक पूर्ण केले.
जसप्रीत बुमराह बाहेर गेल्यामुळे त्याची जागी विराट कोहलीने टीम इंडियाची कमान हाती घेतली. यादरम्यान, प्रसिद्ध कृष्णाने वेबस्टरला आऊट केले. यशस्वी जैस्वालने त्याचा झेल घेतला. ऑस्ट्रेलियासाठी वेबस्टरने सर्वात मोठी खेळी खेळली. भारतीय संघाने 4 धावांच्या आत ऑस्ट्रेलियाचे तीन बळी घेतले.
शेवटच्या विकेटने जोडल्या 15 धावा
मेलबर्न कसोटीत नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड या जोडीने भारताला खूप त्रास दिला होता. दुसऱ्या डावात दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली होती. सिडनीतही त्याचा हेतू तसाच होता. मात्र 15 धावांची भागीदारी केल्यानंतरच मोहम्मद सिराजने बोलंडला आऊट केले. यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 181 धावांवर आटोपला. भारताकडून सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने 3-3 तर बुमराह आणि नितीश रेड्डी यांनी 2-2 विकेट घेतल्या.
हे ही वाचा –
अधिक पाहा..