Eknath Shinde Threat News : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. श्रीनगरमधील तरूणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. परेश चाळके यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरावर गोळीबार करणार असल्याचे धमकीच्या व्हिडीओत २४ वर्षीय तरूणाने म्हटलेय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या तरुणाला अटक करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.
एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हितेश भेंडे असे धमकी देणाऱ्या तरुणाचे नाव आहे. २४ वर्षीय हितेश भेंडे हा सध्या श्रीनगर वारली पाडा या ठिकाणी राहत असल्याचे समजतेय. चाळके यांच्या तक्रारीनंतर हितेश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तरुणावर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसैनिकांनी पोलीस स्थानकाबाहेर मोठ्या संख्येने गर्दी केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून त्या तरूणाचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इंस्टाग्राम खात्यावरून व्हिडीओ पोस्ट करत तरूणाने धमकी दिली. धमकी देणाऱ्या हितेश भेंडे या तरुणाचा शोध ठाण्यातील श्रीनगर पोलीस घेत आहेत. 24 वर्षीय हितेश हा वारली पाडा या ठिकाणी राहतो. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हितेशने एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ठाण्यातील घरावर गोळीबार करणार असल्याचेही त्याने व्हिडीओत म्हटलेय. व्हिडीओमध्ये तरूणाने एकनाथ शिंदे यांना अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा २४ वर्षीय हितेश प्रभाकर धेंडे हा ठाण्यातील श्रीनगर वारली पाडा परिसरात राहतो. एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारी पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. “ हितेश धेंडे याने एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. असभ्य पोस्ट टाकली. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे, असे ठाण्यातील शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.”