महायुतीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राज्यातील पात्र लाडक्या महिलांना 2100 रूपये दिले जातील, असा दावा महायुती सरकारमधील एका मंत्र्याने केला आहे. यामुळे राज्यातील लाखो पात्र महिलांना आता लवकरच 2100 रूपये थेट खात्यावर मिळण्याची शक्यता आहे.
Santosh Deshmukh Murder Case: सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणारमस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपाल के.सी. राधाकृष्णन् यांना भेटणार आहे. काल पुण्यात देशमुख हत्या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेत्यांनी देशमुख यांच्या आरोपींना फाशी द्या, अशी मागणी केली आहे.
Eknath Shinde Receives Death Threat: युवकाकडून जीवे मारण्याची धमकीराज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. परेश चाळके यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर संबधित २४ वर्षांच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांच्या ठाण्यातील घरावर गोळीबार करणार असल्याची धमकी या युवकाने दिली आहे. याबाबतचा व्हिडिओ त्यांने समाज माध्यमावर व्हायरल केला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर पोलीस प्रशासनाने मोठे पाऊल उचलेले आहे. कर्तव्यात कुचराई करणा-या पोलीस अधिका-यांवर कारवाई केली आहे. बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी चार पोलीस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. देशमुख हत्येनंतर बीड पोलिसांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. तत्कालीन एसपी अविनाश बारगळ यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदली केली होती.