Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा बॉलिवूड नव्हे तर साऊथच्या चित्रपटातून करणार कमबॅक !
Saam TV December 29, 2024 10:45 PM

Priyanka Chopra : देसी गर्ल प्रियांका चोप्रा शेवटची २०१९ मध्ये फरहान अख्तरसोबत ‘स्काय इज पिंक’ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर अभिनेत्री बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये गेली. फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' या चित्रपटातून प्रियांकाचा कमबॅक करणार असल्याचे बोलले जात होते, परंतु या चित्रपटाबाबत अद्याप कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. आलेल्या नवीन माहितीनुसार प्रियांका एसएस राजामौली यांच्या चित्रपटातून पुनरागमन करू शकते.

माहितीनुसार, दिग्गज दिग्दर्शक यांनी ला त्यांच्या आगामी चित्रपटासाठी कास्ट केले आहे. या चित्रपटात ती महेश बाबूसोबत दिसणार आहे. अद्याप शीर्षक नसलेल्या या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होणार आहे.

६ महिने चर्चा सुरू होती

एका सूत्राने सांगितले की, 'चित्रपटाची स्क्रिप्ट अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या वर्षीपासून त्याचे शूटिंग सुरू होणार आहे. एसएस राजामौली अशा अभिनेत्रीच्या शोधात होते जी केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. या भूमिकेसाठी प्रियंकापेक्षा कोणी चांगले असू शकतो नाही असे त्यांचे मत आहे सूत्रानुसार, दिग्दर्शक प्रियांकाला गेल्या ६ महिन्यांत अनेकदा भेटले आणि दोघांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला.

प्रियांका चोप्रा एसएस राजामौली सारख्या अनुभवी दिग्दर्शकासोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. महेश बाबूसोबत काम करणे ही अभिनेत्रीसाठी एक नवीन अनुभव असेल. या चित्रपटात प्रियांका चोप्रा महेश बाबूसोबत ॲक्शन करताना दिसणार आहे. हा एक अतिशय चांगले लिहिलेले पात्र आहे आणि प्रियांकानेही या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.