विजयनगर पोलिस ठाण्याचे (Vijayanagar Police Station) पीएसआय भीमा शंकर हेरूर यांनी आरोपी गोविंदराजू आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
बंगळूर : कर्नाटक प्रशासकीय सेवा (केएएस) (Karnataka Administrative Services Exam) उत्तीर्ण होण्यास मदत करण्याची ग्वाही देऊन उमेदवारांकडून ५० लाख रुपये वसूल केल्याच्या आरोपावरून रेल्वेच्या तिकीट निरीक्षकाला पोलिसांनी (Railway Police) अटक केली. गोविंदराजू (वय ४९) असे आरोपीचे नाव आहे. तो दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये रेल्वे तिकीट मुख्य निरीक्षक म्हणून कार्यरत आहे.
विजयनगर पोलिस ठाण्याचे (Vijayanagar Police Station) पीएसआय भीमा शंकर हेरूर यांनी आरोपी गोविंदराजू आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस उपायुक्त (पश्चिम) एस. गिरीश म्हणाले, ‘पीएसआय भीमा शंकर हेरूर आणि गिरीशकुमार टी. एन. यांना सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये मुख्य तिकीट निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले गोविंदराजू केएएस, पीडीओ, ग्राम लेखापाल आणि इतर स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांशी एजंटांच्या माध्यमातून संपर्क साधत. पैसे दिल्यास परीक्षेत उत्तीर्ण होण्यास मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे त्याने सांगितले.
२८ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी गोविंदराजू हा विजयनगर चौथा क्रॉस येथील रमेशच्या घरी आढळून आला. त्यानंतर भीमाशंकर आणि गिरीश कुमार यांनी रमेशच्या घरातून पळत असलेल्या गोविंदाराजूचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्याजवळ चार मोबाईल सापडले. पुढील तपासासाठी त्याला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. चौकशीदरम्यान गोविंदराजू २०१८ मध्ये सीसीबी कार्यालयात दाखल झालेल्या परीक्षेच्या फसवणुकीच्या प्रकरणात सामील असल्याचे समोर आले.
पीडीओ आणि केएएस प्राथमिक परीक्षेच्या उमेदवारांशी मध्यस्थांमार्फत संपर्क साधून त्यांना परीक्षा उत्तीर्ण करण्यात मदत करण्याचे त्याने आश्वासन दिले आहे. पीडीओ पदांसाठी २५ लाख आणि केएएस पूर्व परीक्षेसाठी ५० लाख रुपये निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यांना ओएमआर शीटमध्ये माहीत असलेली उत्तरे भरण्याची सूचना केली आहे. बाकीची रिकामी सोडा आणि नंतर योग्य उत्तरे भरण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. आरोपी उमेदवारांचे दाखले, प्रवेशपत्र आणि धनादेश गोळा करीत असे. एका फोनची तपासणी केली असता, त्यात ४६ नावे व इतर कागदपत्रे आढळून आली, असे डीसीपींनी सांगितले.