'पुष्पा 2 : द रूल' (Pushpa 2) चित्रपट रिलीज होऊन आता तीस दिवस पूर्ण झाले आहे. या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चित्रपटातील साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun ) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna ) यांची केमिस्ट्री चाहत्यांना भरपूर आवडली आहे. हा चित्रपट सुकुमार दिग्दर्शित आहे. या चित्रपटाला रिलीज होऊन आता तीस दिवस पूर्ण झाले आहेत.
अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाच्या रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच बंपर कमाई केली आहे. 'पुष्पा 2' सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. हा चित्रपट सुरुवातीपासूनच विक्रम रचले आहेत. हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'पुष्पा 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ३०'2' चित्रपटाने पहिल्या दिवशी 164.25 कोटींची बंपर कमाई केली होती. तर दहाव्या दिवशी 63.3 कोटी, विसाव्या दिवशी 14.5 कोटींची कमावले आहेत. चित्रपटाने रिलीजच्या पंचवीसाव्या दिवशी 16 रुपये कमावले. या चित्रपटाच्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे.
अखेर मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2'ने तिसाव्या दिवशी 3.85 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने तीस दिवसात एकूण 1193.6 कोटी रुपये कमावले आहेत. आता लवकरच 'पुष्पा 2' चित्रपट भारतात 1200 कोटींचा गल्ला पार करेल. आता पुढे देखील 'पुष्पा 2'ची हवा कायम राहणार असल्याचे दिसून येत आहे.
'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पेड प्रीव्यूमध्ये 10.65 कोटी रुपयांची कमाई केली. 'पुष्पा 2' चित्रपटाने शाहरुख खानच्या पठाण, जवान चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तर बाहुबली 2, स्त्री 2 ला देखील मागे टाकले आहे. 2021 मध्ये 'पुष्पा द राइज' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली होती.