Health Tips : मायक्रोव्हेवमध्ये अन्न गरम करताय?
Marathi January 06, 2025 04:24 PM

जेवण गरम करण्यासाठी हल्ली बऱ्याच महिला मायक्रोवेव्हचा वापर करतात. अन्न गरम करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग समजला जातो. पण, आरोग्यासाठी मायकोवेव्हमध्ये गरम केलेले पदार्थ खाणे हानिकारक सांगितले जाते. मायक्रोवेव्हमध्ये अन्न शिजवल्याने त्यातील पोषक घटक नष्ट होतात. यासह अन्नातील व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी यांसारख्या पाण्यात विरघळणाऱ्या व्हिटॅमिन्सची कमतरता निर्माण होते. जाणून घेऊयात, मायकोवेव्हमध्ये पदार्थ गरम केल्याने शरीरावर काय परिणामा होतो आणि काळजी काय घ्यावी,

मायकोवेव्हमध्ये वापरल्याने शरीरावर काय परिणाम होतो-

  • दररोज मायक्रोवेव्ह वापरल्याने पदार्थातील पोषकतत्वे कमी होतात.
  • यासह पदार्थातील व्हिटॅमिन्स आणि आयर्नचे प्रमाण कमी होते.
  • दररोज अन्न गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर केल्यास कॅन्सरचा धोका निर्माण होतो.
  • असे म्हटले जाते. पण, महिलांचे काम कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेला मायक्रोवेव्ह वापरताना काही गोष्टींची काळजी घेतलीत तर तो सुरक्षित मानला आहे.

खबरदारी काय घ्याल –

  • मायक्रोवेव्हमध्ये जास्त वेळ पाणी किंवा इतर लिक्विड पदार्थ गरम करू नये.
  • पदार्थाला देण्यात वेळतेच गरम करावेत.
  • मायक्रोवेव्हमध्ये लहान मुलांचे पदार्थ शिजवू नयेत किंवा गरमही करू नयेत. लहान मुलांच्या आरोग्यासाठी हे अपायकारक ठरू शकते.
  • मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करत असताना किमान 2 फूट अंतरावर उभे राहावे.
  • मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करण्यासाठी योग्य भांड्याची निवड करावी. कारण जर चुकीची भांडी वापरलीत तर आरोग्यासाठी मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेले पदार्थ घातक ठरू शकतात.
  • मायक्रोवेव्हमध्ये बऱ्याचजणांना प्लास्टिकची भांडी वापरण्याची सवय असते. पण, असे करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. प्लास्टिकमध्ये बीपीए आढळते. हे बीपीए पदार्थात मिसळून शरीरात पोहोचल्यास हार्मोन्सवर परिणाम होतो. त्यामुळे अन्न गरम करण्यासाठी प्लास्टिक वापरणे टाळावे.
  • मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ गरम करण्यासाठी काचेचे कंटेनर सर्वात सुरक्षित मानले जाते.
  • काचेच्या भांड्याशिवाय सिरॅमिक भांडी हा देखील उत्तम पर्याय आहे. मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ गरम करण्यासाठी सिरॅमिक भांड्याचा वापर करू शकता.

पुढील पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नयेत –

  • तांदूळ
  • उकडलेली अंडी
  • कॉफी
  • चिकन
  • मासे

– जाहिरात –

– जाहिरात –

हेही पाहा –

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.