गेवराई - वाळू प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याने सोमवारी गेवराईच्या महसूलातील चार कर्मचाऱ्यांचे निलंबन केल्यानंतर गोदापात्रात एक पथक दिवसभर फिरत होते. शिवाय पाडळसिंगी येथील टोलनाक्यावर एका पथकाने सिसिटिव्ही फुटेजची माहीती घेतली असता एकाच हायवाने चक्क वर्षभर जवळपास पावणे सातशे वेळा वाळू वाहातूक केल्याचे उघडकीस आले.
यावरुन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या आदेशानुसार हायवा मालक गोकुळ गायकवाड याच्या विरोधात सात कोटीच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली असल्याने वाळू तस्कर यांचे धाबे दणदणाले आहेत.
गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीचे पात्र हे वाळू चोरीचे कुरण बनले आहे. स्वतःच्या आर्थिक फायदा व्हावा यासाठी वाळूची चोरी करणारे तस्कर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. गेवराईचे महसूल प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्यामुळे चोरीची वाळू म्हणून पोलीस प्रशासनाचा याशी कसलाही संबंध नसताना ते हस्तक्षेप करतात.
वास्तविक गौणखनिज विभाग हा महसूलचा असून, पोलीस प्रशासन याचा गेवराईतील वाढलेला हस्तक्षेप यामुळे गेवराईची कायदा सुव्यवस्था बिघडत चाललेली असताना बीडचे जिल्हाधिकारी आता चांगलेच अॅक्शन मोडवर आले असून, सोमवारी (ता. ६) गेवराईतील चार कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याने त्यांचे निलंबन केले.
एवढेच नाही तर सोमवारी दिवसभर एक पथक गोदापात्रात अवैध वाळू वाहतुक रोखण्यास निगराणी ठेवले तर, पांडळसिंगी येथील टोलनाक्यावरील सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले फुटेज तपासले असताना वासनवाडी येथील गोकुळ गायकवाड यांच्या मालकीच्या हायवाने वर्षभरात ६७९ वेळा वाळू वाहतूक केल्याचे पाडळसिंगी येथील टोलनाक्यावरील तिस-या डोळ्यातून उघड झाल्याने जिल्हाधिकारी यांनी थेट ७ कोटी ३६ लाख रुपये दंडाची नोटीस गोकुळ गायकवाड याला बजावण्यात आली असल्याची माहीती मिळाली असून, जिल्हाधिकारी यांच्या कारवाईने गेवराईतील वाळू माफीयांचे धाबे दणदणले आहे.