अजित पवार दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबई इथं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज बैठक होत आहे. या बैठकीत पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवर चर्चा होणार आहे. यात अजितदादा पुण्यासह बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेऊ शकतात, अशी चर्चा आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येचे प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. त्यामुळे बीडचा पालकमंत्री कोण होणार, यावर चर्चा रंगली आहे.
Ajit Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मोर्चेबांधणी; अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे चिंतन शिबिरराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका फेब्रुवारी-मार्चमध्ये होण्याची शक्यता गृहीत धरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी चालवली आहे. या पार्श्वभूमीवर 18 आणि 19 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर इथं चिंतन शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात पक्षाचा पुढील सहा महिन्यांचा कार्यक्रमही घोषित केला जाणार आहे. पक्षाच्या विविध आघाड्यांची बैठक शुक्रवारी प्रदेश कार्यालयात पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व खासदार सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. शिबिराला राज्यातील 250 ते 300 पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी पक्षाचे सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक धोरण पुढे नेण्यासंदर्भात चर्चा होईल. विविध अभ्यासक, विश्लेषकांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले आहे.