वाशिमध्ये महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कारंजा तालुक्यातील खेर्डा जिरापुरे येथे ही घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. आरोपींनी महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केल्यामुळे आरोपींनी तिची हत्या केल्याचे तपासातून उघड झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, कारंजा तालुक्यातील खेर्डा जिरापुरे येथे ३ जानेवारीला सोनू लवलेश कोडापे या महिलेची निघृण हत्या करण्यात आली होती. या महिलेची हत्या करणाऱ्या २ आरोपींना कारंजा पोलिसांनी अटक केली आहे. संदीप गायकवाड आणि किशोर ऊर्फ बाबू कोवे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या आरोपींनी महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. त्या महिलेने विरोध करून गावात तक्रार करण्याची धमकी आरोपींना दिली. त्यामुळे आरोपींनी धारदार विळ्याने तिची केल्याची कबुली पोलिसांना दिली.
३ जानेवारी रोजी महिलेचा मृतदेह गावालगतच्या जंगलामध्ये आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. महिलेचा मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी तपास सुरू केला होता. याप्रकरणी कारंजा पोलिसांनी तपासचक्र फिरवले. गावातील रहिवासी संदीप गायकवाड हा व्यक्ती घटना घडल्यापासून बेपत्ता असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.crime
पोलिसांनी या संशयित आरोपीचा शोध सुरू केला असता तो मुंबईला फरार होण्याच्या मार्गावर होता. तेवढ्यात संदीप गायकवाडला पोलिसांनी बुलडाणाच्या नांदुरा रेल्वे स्टेशनच्या बाहेरून ताब्यात घेतलं. संदीप गायकवाडची पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसंच साथीदार किशोर कोवेचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघड झाले. सध्या दोन्ही आरोपींना कारंजा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.