जवाहर हायस्कूलचे स्काऊट निवास शिबिर
esakal January 08, 2025 03:45 AM

6509
टिक्केवाडी (ता. भुदरगड) ः येथे जवाहर हायस्कूल प्रशालेच्या स्काऊट गाईडच्या मुलांनी उभारलेले तंबू.
..........
जवाहर हायस्कूलचे
स्काऊट निवासी शिबिर
कोनवडे, ता. ६ : निळपण (ता. भुदरगड) येथील जवाहर हायस्कूल प्रशालेच्या स्काऊट गाईड विषयांतर्गत स्काऊट निसर्ग निवास शिबिर टिक्केवाडीच्या गोठण परिसरात झाले. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गविषयी प्रेम, संघ भावना, नेतृत्व गुण गुणांची वाढ होण्यासाठी जिल्ह्यातील काही मोजाक्याच शाळेत स्काऊट गाईड निवासी शिबिर राबविण्यात येते. जवाहर प्रशालेने ही परंपरा नियमित ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
शिबिर काळात मुलांनी डोंगर परिसरात तंबू उभारले. सायंकाळी स्वतः जेवण तयार करण्याचा अनुभव घेतला. रात्री दहा वाजता शेकोटी प्रार्थनेने पहिल्या दिवसाची सांगता झाली. दुसऱ्या दिवसाची सुरुवात सर्वधर्मसमभाव प्रार्थनेने झाली. त्यानंतर तंबू सजावटीचे परीक्षण स्काऊट मास्तर एस. बी. पाटील, वाय. पी. पाटील. एम. एम. देसाई यांनी केले. यावेळी प्रशालेचे माजी विद्यार्थी एस. एम. पाटील, डी. एन. गुरव, एस. बी. पाटील, डी. एस. पाटील. डी. बी. कदम. पी. आर. नलवडे उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.