चोपडा (जळगाव) : मित्रांनी मिळून पार्टी केली. या पार्टीत दारू देखील प्यायलो होती. दारू प्यायल्याबाबत आपल्यातीलच एकाने घरी सांगितले. असा संशय सोबतच्या मित्रांना होता. या संशयातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील विरवाडे येथे घडली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील विरवाडे येथील दादा बारकू ठाकूर (वय ३१) असे घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दादा ठाकूर याने आपल्या काही मित्रांसोबत पार्टी केली. या पार्टीमध्ये चार ते पाच जण होते. या सर्वानी पार्टीत दारू देखील घेतली होती. पार्टीमध्ये दारू पिण्याबाबतची माहिती दादा ठाकूर यानेच काहींच्या घरी सांगितल्याचे संशय सोबतच्या मित्रांना आला होता. या सोबतच्या चार ते पाच जण ठाकूर याच्या घरी पोहचले.
लाकडी दांड्याने मारहाण
सायंकाळी सात- साडेसात वाजेदरम्यान चार- पाच जण जात ठाकूर यास जाब विचारत मारहाण केली. मारहाणीत त्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केला. यात दादा ठाकूर हा जबर जखमी झाला होता. यानंतर त्यास उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे प्राथमिक उपचार करून ला उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा न होता; अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
संशयितांना घेतले ताब्यात
दादा ठाकूर याचा शनिवारी (ता.२८) सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चोपडा शहर त गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत संशयितांची ओळख परेड आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम करण्यात आले. याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.