Tomato Juice : रिकाम्यापोटी टोमॅटो ज्यूस पिण्याचे फायदे
Marathi January 01, 2025 07:24 PM

सकाळी नाष्ट्यामध्ये टोमॅटो ज्यूस पिण्याचे शरीराला भन्नाट फायदे होतात. टोमॅटो ज्यूस शरीराला आवश्यक पोषकतत्वे प्रधान करतो. अनेक शारीरिक व्याधींपासून आराम मिळण्यासाठी रिकाम्यापोटी टोमॅटोचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घेऊयात, रिकाम्यापोटी टोमटो ज्यूस पिण्याने शरीरावर काय परिणाम होतो.

टोमटो ज्यूस पिण्याचे फायदे –

  • हिवाळ्यात रिकाम्यापोटी टोमॅटो ज्यूस प्यायल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
  • रिकाम्यापोटी टोमॅटो ज्यूस प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीराची चयापचय क्रिया वाढते.
  • टोमॅटो ज्यूसमुळे शरीरातील साचलेली घाण काढून टाकण्यास मदत मिळते.
  • शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करायचे असेल तर रिकाम्यापोटी टोमॅटो ज्यूस प्यायला हवा.
  • टोमॅटो ज्यूस डायबिटीस रुग्णांसाठी वरदान मानले जाते. टोमॅटोच्या ज्यूसमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवली जाते.
  • हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर टोमॅटो ज्यूस प्यायला हवा. टोमॅटोमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
  • दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक राहायचे असेल तर रिकाम्यापोटी टोमॅटो ज्यूस प्यायला हवा.
  • थंडीच्या दिवसात पाणी कमी प्यायले जाते. अशावेळी शरीर हायड्रेट राहण्यासाठी टोमॅटो ज्यूस प्यायला हवा.
  • रिकाम्यापोटी टोमॅटो ज्यूस प्यायल्याने पोट साफ होते. बद्धकोष्ठतेसारख्या समस्या जाणवत नाही.
  • रिकाम्यापोटी टोमॅटो ज्यूस प्यायल्याने हाडे मजबूत होतात.
  • शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहण्यासाठी रोज सकाळी रिकाम्यापोटी टोमॅटो ज्यूस पिणे गरजेचे आहे.
  • सर्दी-खोकला झाला असेल तर टोमॅटो ज्यूस प्यायला हवा. तुम्ही गरमा गरम टोमॅटो सूप पिऊ शकता.
  • टोमॅटो ज्यूस प्यायल्याने केस निरोगी राहतात. खरं तर, ज्यूस प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे स्कॅल्प निरोगी राहतो.
  • रिकाम्यापोटी टोमॅटो ज्यूस प्यायल्याने वेटलॉससाठी मदत होते. त्यामुळे वेटलॉसच्या डाएटमध्ये टोमॅटो ज्यूसचा समावेश करावा.

टोमॅटो ज्यूस बनवण्याची पद्धत –

  • लाल रंगाचे पिकलेले आणि रसाळ टोमॅटो घ्यावेत.
  • टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यावेत.
  • मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो, आल्याचा तुकडा, चिरलेली कोथिंबीर बारीक करून घ्यावे.
  • गरज लागल्यास थोडे पाणी घालावे.
  • तयार ज्यूस गाळून प्यावा.

 

 

 

हेही पाहा –


संपादन – चैताली शिंदे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.