Health Tips : हलका व्यायाम आणि पोट होईल सपाट
Marathi January 01, 2025 08:24 PM

आजच्या युगात प्रत्येकाला तंदुरुस्त आणि आकर्षक दिसायचं असतं. विशेषतः बऱ्याच लोकांना आपली कंबर बारीक असावी अशी इच्छा असते. यासाठी जिममध्ये तासनतास घाम गाळणे आवश्यक आहे, असे अनेकांना वाटते. परंतु वास्तव वेगळे आहे. आठवड्यातून काही तास व्यायाम करूनही कंबरेचा आकार कमी करता येतो, असे नवीन संशोधनातून दिसून आले आहे.

व्यायामाचा साधासोपा फॉर्म्युला :

नियमित व्यायाम केल्याने वजन तर कमी होतेच पण कंबरेचा आकारही कमी होतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, जर लोकांनी आठवड्यातून फक्त 150 मिनिटे म्हणजे सुमारे अडीच तास व्यायाम केला तर त्यांच्या कंबरेचा आकार कमी होऊ शकतो.

– जाहिरात –

सडपातळ कंबरेसाठी हे व्यायाम प्रभावी :

जलद चालणे, जॉगिंग, सायकलिंग आणि योगासने हे व्यायाम प्रकार कंबरेचा आकार कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. या प्रकारांमुळे पोटाची चरबी वेगाने कमी होते आणि पचनक्रिया देखील सुधारते. योगाबद्दल सांगायचे तर प्लँक आणि ट्विस्ट यांसारखी आसने कंबर स्लिम करण्यासाठी विशेषतः प्रभावी आहेत.

कंबरेची चरबी कमी करणे आरोग्यासाठी फायदेशीर :

तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, पोट आणि कंबरेची चरबी कमी करणे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे हृदयविकार, मधुमेह आणि रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. आठवड्यातून काही तास व्यायाम करून तुम्ही फक्त तंदुरुस्त दिसू शकत नाही तर आजारांपासूनही दूर राहू शकता.

– जाहिरात –

खाण्याच्या योग्य सवयी आवश्यक :

व्यायामाचा परिणाम तेव्हाच दिसू लागेल जेव्हा त्यासोबत योग्य आहारही घेतला जाईल. तळलेले अन्न टाळणे आणि हिरव्या भाज्या, फळे आणि प्रथिने युक्त आहार घेणे खूप महत्वाचे आहे. भरपूर पाणी प्यायल्यामुळे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि स्नायू मजबूत होतात.

कमी वेळातही मिळवू शकता फायदे :

तुमच्याकडे जास्त वेळ नसला तरी तुम्हाला कमी वेळात मोठे फायदे मिळू शकतात.तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, ठवड्यातून तीन ते चार वेळा 30-40 मिनिटे व्यायाम केल्यानेही कंबरेच्या आकारमानात मोठा फरक पडू शकतो. छोटे बदल देखील मोठे परिणाम घडवून आणू शकतात.

परिणामांसाठी धीर धरा :

हे लक्षात ठेवा की तुमची कंबर स्लिम होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. तुम्हाला त्वरित परिणाम न मिळाल्यास निराश होऊ नका. सातत्यपूर्ण आणि योग्य तंत्राने केलेला व्यायाम तुम्हाला अपेक्षित परिणाम नक्कीच देईल

हेही वाचा : Healthy Breakfast : नाश्त्यामध्ये घ्या कडधान्यांचे सलाड


संपादन- तन्वी गुंडये

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.