पंजाब अँड सिंध बँकेची एफडी गुंतवणूकदारांना दुहेरी खूशखबर, विशेष एफडीमध्ये गुंतवणुकीची मुदत आणि व्याजदर वाढवले
मुंबई : पंजाब अँड सिंध या सरकारी बँकने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. बँकेने एफडी गुंतवणूकदारांना दुहेरी खूशखबर दिली आहे. आपल्या विशेष एफडीमध्ये गुंतवणुकीची अंतिम मुदत पंजाब अँड सिंध बँकेने वाढवली आहे. या विशेष कालावधीच्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 होती. ही मुदत आता 31 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याशिवाय, बँकेने त्यांच्या नियमित एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. हे नवीन दर 1 जानेवारी 2025 पासून लागू झाले आहेत.
बँकेची विशेष एफडीपंजाब अँड सिंध बँक आपल्या ग्राहकांना 222 दिवस, 333 दिवस आणि 444 दिवसांची विशेष एफडीमध्ये गुंतवणूकीची संधी देते. या विशेष एफडीवर बँक कमाल 8.05 टक्के व्याज देत आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, बँक 222 दिवसांच्या एफडीवर 7.05 टक्के, 333 दिवसांच्या एफडीवर 7.10 टक्के आणि 444 दिवसांच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज देत आहे. बँक सुपर ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांच्या एफडीवर 8.05 टक्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज देते. सुपर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्क्यांव्यतिरिक्त 0.15 टक्के अतिरिक्त व्याज मिळत आहे.
नियमित एफडीवर व्याजदरसर्व भारतीय रहिवासी, एनआरआय आणि एनआरओ या एफडीमध्ये गुंतवणूक करू शकतात. यामध्ये सात ते 30 दिवसांच्या एफडीवर 2.8 टक्के व्याज मिळते. तर 31 ते 45 दिवसांच्या गुंतवणुकीवर 3 टक्के व्याजदर आहे. गुंतवणूकदारांनी 46 ते 90 दिवसांसाठी एफडी केल्यास 4.25 टक्के व्याजदर मिळेल. याशिवाय 91 ते 179 दिवसांसाठी 4.25 टक्के आणि 180 ते 269 दिवसांच्या एफडीवर 5.25 टक्के व्याज मिळते.
एफडीवरील सुधारित व्याज दर7 - 14 दिवस - 4.00 टक्के15 - 30 दिवस - 4.00 टक्के31 - 45 दिवस - 4.25 टक्के46 - 90 दिवस - 4.50 टक्के91 - 120 दिवस - 4.50 टक्के121-150 दिवस -4.75 टक्के151 - 179 दिवस - 6.00 टक्के180 - 269 दिवस - 5.25 टक्के270 - 332 दिवस - 5.50 टक्के