भारत-ऑस्ट्रेलिया संघातील पाचवा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर रंगला आहे. या अंतिम कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ‘रिषभ पंत’ने (Rishabh Pant) भारताच्या 59 धावांवर 3 विकेट्स गेल्या असताना शानदार फलंदाजी केली. त्याने ऑस्ट्रेलियन भूमीवर सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. पण यावेळीही भारताची शीर्ष फळी पुन्हा एकदा संघाला दमदार सुरूवात करण्यात अपयशी ठरली.
रिषभ पंतने 33 चेंडूंमध्ये 6 चौकारांसह 4 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. त्याच्या या खेळीला महान भारतीय फलंदाज ‘सचिन तेंडुलकर’ने (Sachin Tendulkar) खरोखरच उल्लेखनीय म्हटले आहे. तेंडुलकरने एक्स ट्विटरवर पोस्ट केले, “ज्या विकेटवर बहुतेक फलंदाजांचा स्ट्राईक रेट 50 किंवा त्याहून कमी आहे. त्यावर रिषभ पंतने 184 वर स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याची खेळी खरोखरच उल्लेखनीय आहे. त्याने पहिल्याच चेंडूपासून ऑस्ट्रेलियाला हादरून सोडले. त्याची फलंदाजी पाहणे नेहमीच मनोरंजक असते. किती प्रभावी खेळी.”
पंतने मिचेल स्टार्कविरुद्धच्या षटकाराच्या जोरावर 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने इंग्लंडच्या जॉन ब्राउन (मेलबर्न 1895) आणि वेस्ट इंडिजच्या रॉय फ्रेडरिक्स (पर्थ 1975) यांनी सेट केलेल्या 33 चेंडूंच्या मागील प्रयत्नांना अधिक चांगले केले. कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजाने झळकावलेले हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक ठरले.
एका कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजाने सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा रेकाॅर्डही पंतच्या नावावर आहे, जो त्याने 2022 मध्ये बंगळुरू येथे श्रीलंकेविरूद्ध 28 चेंडूत पूर्ण केला होता. यष्टिरक्षक-फलंदाजाचा डाव अखेर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने संपुष्टात आणला जेव्हा चेंडू स्टंपच्या मागे ॲलेक्स कॅरीच्या हातात गेला.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय खेळाडूंनी सॅम कोन्स्टासला धमकावले, प्रशिक्षकाने केला मोठा आरोप
IND vs AUS; रोहित शर्माच्या वक्तव्यावर इरफान पठाणची प्रतिक्रिया व्हायरल
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी 3 सर्वात मोठ्या भागीदारी