गुंतवणूक योजना बातम्या: पैशांची गुंतवणूक करताना महत्वाच्या दोन गोष्टींचा विचार केला जातो. पहिलं म्हणजे गुंतवणूक केलेले पैसे सुरक्षीत ठिकाणी आहेत का? आणि दुसरे म्हणजे आपल्या ठेवीवर किती परतावा मिळतो? तुम्ही जर योग्य ठिकाणी योग्य वेळी पैशांची गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. दरम्यान, तुम्हाला जर कमी काळात चांगला परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही पैशांची गुंतवणूक कुठे कराल? किती वर्षाच तुमचे पैसे दुप्पट किंवा तिप्पट होतील? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, लोक विचारतात की त्यांची जमा केलेली रक्कम दुप्पट किंवा तिप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील. पूर्वी बँकेत जमा केलेला पैसा 9 वर्षात दुप्पट होत होती तर पोस्ट ऑफिसमध्ये जमा केलेला पैसा 10 वर्षात दुप्पट होत होते. पण तुम्ही जर शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा इक्विटीमध्ये पैशांची गुंतवणूक केली तर तुमचे पैसे 5 वर्षांत दुप्पट आणि 7.5 वर्षांत तिप्पट होऊ शकतात. अशा परिस्थितीत 10 वर्षात आपला पैसा किती होईल, असा प्रश्न अनेकांना पडतो.
दरम्यान, तुमचे पैसे दुप्पट किंवा तिप्पट होण्यासाठी किती वेळ लागेल हे जाणून घेण्यासाठी फायनान्समध्ये 72 चा नियम वापरला जातो. या नियमाच्या मदतीने तुम्हाला 10 वर्षात किती पैसे मिळतील हे देखील कळू शकते. जरी पैसे दुप्पट आणि तिप्पट होण्यासाठी लागणारा वेळ मोजण्यासाठी आर्थिक तज्ञ मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि स्प्रेडशीट प्रोग्राम वापरतात. फायनान्स नियम 72 च्या मदतीने, तुम्ही 10 वर्षात तुमचे पैसे किती असतील हे शोधू शकता.
72 च्या नियमाच्या मदतीने तुम्ही हे शोधू शकता की तुमची गुंतवणूक केलेली रक्कम 10 वर्षांत किती पटीने वाढेल. समजा तुम्ही म्युच्युअल फंड किंवा इक्विटीमध्ये पैशांची गुंतवणूक केली आहे. या फंडात जर तुम्हाला 20 टक्के परतावा मिळाला तर तुम्हाला 72 ला 20 ने भागावे लागेल. म्हणजे तुम्हाला 3.6 वर्षांत तुमची रक्कम दुप्पट होईल. आता तुम्हाला तुमचा दुप्पट होण्याचा वेळ माहित आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही 10 वर्षांत तुमचे पैसे किती होतील हे शोधू शकता. यासाठी तुम्हाला दुप्पट होण्याचा कालावधी 10 वर्षांत म्हणजे 3.6 मध्ये विभागावा लागेल. त्यानंतर तुम्हाला 2.77 मिळेल. याचा 2 ने गुणाकार करावा लागेल. ज्यामध्ये तुम्हाला 5.55 मिळतील. हे तुमच्या गुंतवलेल्या रकमेचे 10 वर्षातील मूल्य असेल, जे 5.55 पट आहे.
अधिक पाहा..