Curly Hairs : कुरळ्या केसांची काळजी कशी घ्याल?
Marathi January 02, 2025 09:25 PM

कुरळे केस म्हणजे कित्येक महिलांसाठी एखाद्या पर्वणीपेक्षा कमी नसते. काही महिलांचे जन्मत: केस कुरळे असतात तर काही सलोन किंवा पार्लरमध्ये जाऊन केस कुरळे करून घेतात. कुरळे केस दिसायला क्लासी लूक देणारे असले तरी त्यांची योग्यरित्या काळजी घेणेही आवश्यक आहे. तुमचेही केस कुरळे आहेत का? मग काळजी कशी माहित नाही. मग ही बातमी तुमच्यासाठी. जाणून घेऊयात, कुरळ्या केसांची काळजी कशी घ्यावी.

अशी घ्यावी काळजी –

  • सर्वात पहिले तर केसांसाठी योग्य हेअर प्रॉडक्ट निवडावेत.
  • केस तुटणे, गळणे टाळण्यासाठी केसांचे योग्य हेअर केअर रुटीन फॉलो करावेत.
  • कुरळे केस खूपच डॅमेज आणि ड्राय झाले असतील तर एक्सपर्टचा सल्ला घेऊन हेअर प्रॉडक्ट बदलावेत.
  • केस स्वच्छ करण्यासाठी मॉइश्चरायजिंग शॅम्पू वापरावेत.
  • कुरळ्या केसांसाठी ट्राय मॉइश्चरायझर, सल्फेट फ्री, शिया बटर, ग्लिसरीन असलेले शॅम्पू वापरणे फायदेशीर ठरेल.
  • केसांना शॅम्पू केल्यानंतर कंडीशनिंग करणे विसरू नये.
  • कंडीशनरसाठी तुम्ही हेअर एक्सपर्टचा सल्ला घेऊ शकता.
  • कुरळ्या केसांना कंडीशनर वापरल्याने कोरड्या केसांची समस्या कमी होते.
  • केसांना आठवड्यातून किमान २ वेळा तरी धुवावेत.
  • केसांचे आरोग्य राखण्यासाठी केसांना तेल लावण्यास विसरू नये.
  • केसांना तुम्ही आठवड्यातून 2 वेळा तरी तेलाने मालिश करावी.
  • तुम्ही रात्रभर किंवा केस धुण्याआधी अर्धातास केसांना तेल लावू शकता.
  • केसांना तुम्ही कोमट तेलाचा वापर केलात तर अधिक फायदे तुम्हाला होतील.
  • कुरळ्या केसांच्या शाइनसाठी हेअर मास्कचा वापर करण्यात येतो. हेअर मास्कमुळे केसांना पोषण मिळते.
  • हेअर एक्सपर्टच्या सल्लाने हेअर मास्कची निवड करावी.
  • महिन्यातून दोन वेळा म्हणजेच दर 15 दिवसांनी हेअर मास्क लावावा.
  • कुरळे केस रात्री झोपताना बांधून झोपावेत. रात्री मोकळे ठेवून झोपल्याने केसांमध्ये गुंता होऊ शकतो.
  • कुरळे केस असतील तर झोपताना सिल्कचे कव्हर असणारी उशी झोपण्यास वापरावी.
  • कुरळे केस वारंवार विंचरू नये.
  • बाहेर जाताना केस झाकून ठेवावेत. यामुळे केसांमध्ये माती, धूळ जाणार नाही.

 

 

 

हेही पाहा –


 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.