सैनिक म्हटले की सगळ्यांना अभिमान वाटतो. सैनिकांच्या रात्रंदिवस केलेल्या पहाणाऱ्याने आपण निर्धास्त झोपू शकतो. सैनिकांची योग्य काळजी प्रत्येक देश घेत असतो. त्यामुळे त्यांना अधिक चांगल्या सोयी सुविधा आणि वेतन दिले जाते. परंतू सैनिकांना कधी ना कधी युद्धभूमीवर जावेच लागते. परंतू एक देश असा आहे. ज्यांच्या सैनिकांना एक कोटी रुपये वेतन दिले जाते. आणि त्यांना कधी युद्धावर जाण्याची वेळच येत नाही…
व्हेटिकन सिटी हा जगातला सर्वात छोटा देश समजला जातो. फार तर १०० एकरावर पसरलेल्या या देशात एक हजाराहून कमी लोक रहातात. मात्र दरवर्षी येथे लाखो टुरिस्ट येथे येतात. या छोट्या देशाचे लष्कर देखील खूपच छोटे आहे.त्यात १५० हून कमी सैनिकांचा समावेश आहे. या सैनिकांची जबाबदारी असते ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च असलेल्या पोप यांची सुरक्षा करणे. ते पोप यांच्या सुरक्षेसाठी बलिदान करण्याची शपथ घेतात.
हे स्वीस गार्ड जगातील सर्वात जुन्या सैन्य तुकडी पैकी एक आहे. या सैन्य दलात भरती होण्यासाठी तुमच्याकडे काही स्पेशल गुणांची गरज असते. स्वीस गार्डचे सदस्य होणे आणि कॅथलिक धर्म असणे गरजेचे असते. यात तुकडीत केवळ पुरुषांना भरती केली जाते. त्यांनी लग्न केलेले नसावे. त्यांचे वय १९ ते ३० वर्षांदरम्यान असणे गरजेचे असते.त्यांची उंची किमान ५ फूट ८ इंच ( १७४ सेंटीमीटर) असणे गरजेचे असते.
जगातला सर्वात छोटा आणि सुंदर देश व्हेटीकन सिटी हा इटलीची राजधानी रोमच्या आत आहे. येथे रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख धर्मगुरु पोप यांचे निवासस्थान आहे. व्हेटिकन सिटी खूपच सुंदर देश असून तेथे रहिवाशांच्या पेक्षा पर्यटकांची संख्या अधिक असते.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की स्वीस गार्डना भलेही युद्धात भाग घ्यावा लागत नसला तरी त्यांना पगार भरपूर असतो. त्यांचे वेतन € १,५०० ते € ३,६०० ( सुमारे ४.५ लाख रुपये ) प्रति महिना असते. काही बातम्यांनुसार त्यांना १३ महिन्यांचा पगार मिळतो. याच बरोबर त्यांना अनेक सुविधा देखील असतात. जसे मोफत निवास, टॅक्स फ्री शॉपिंग, वर्षातून ३० दिवसांची सुट्टी. या सुविधा आणि वार्षिक वेतन मिळून त्यांना एकूण १ कोटी रुपयांचे पॅकेज मिळते.