आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ आपल्याला रोज ताजी फळे खाण्याचा सल्ला देतात. मात्र, मधुमेहाच्या व्यक्तींना त्यांच्या डाएटवर विशेष लक्ष द्यावे लागते आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागते. असा कोणताही पदार्थ जो मधुमेही व्यक्तींच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवू किंवा इन्सुलिनवर परिणाम करु शकतो, तो खाणे त्यांना टाळावे लागते. अन्यथा याचा त्यांच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो.
फळांमध्ये नैसर्गिक साखर असल्याने, मधुमेहाच्या रुग्णांसाठी फळे खाणे सुरक्षित आहे की नाही ? याबद्दल सर्वसामान्यांना चिंता असते. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी फळे खाणे सुरक्षित आहे का ?
तुमच्या मनातील या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आम्ही आहारतज्ज्ञ कामना देसाई यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “होय, मधुमेहाचे रुग्ण फळे खाऊ शकतात. परंतु, नियंत्रित प्रमाणात त्यांचे सेवन करणे गरजेचे आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी देखील रोज फळे खाणे आवश्यक आहे. फक्त लक्षात ठेवा की तुम्ही फळांमध्ये केळी, सफरचंद, चिकू, लिची इत्यादी फळांचे अधिक सेवन करू नये.
मधुमेहाच्या व्यक्तींसाठी सर्वोत्तम फळे - Best Fruits For Diabetes Patient in Hindiआहारतज्ज्ञांनी इथे काही फळांची माहिती दिली आहे. ही फळे मधुमेही रुग्ण आरामात खाऊ शकतात.
1. किवीidiva
संशोधनामध्ये असे सिद्ध झाले आहे की, किवीचे फळ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवली जाऊ शकते. त्यामुळे या सुपरफ्रूटला तुम्ही देखील तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करु शकता.
हेही वाचा : किवीचे हे 7 आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहे का ?
2. जांभूळidiva
जांभूळ हे फळ डायबिटीजच्या रुग्णांसाठी अतिशय सर्वोत्तम फळ आहे. हे फळ आपल्या रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास आणि नियंत्रित करण्यास मदत करते. जांभळाच्या बियांची पावडर करुन त्याचे सेवन मधुमेहाचे रुग्ण करु शकतात. या बिया रक्तातील साखरेचे प्रमाण नियमित करण्यास प्रभावी आहेत.
idiva
डायबिटीजच्या रुग्णांसाठी स्टार फ्रूट हे अतिशय फायदेशीर आहे. कारण, हे फळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करुन त्यामध्ये सुधारणा करण्यास मदत करते.
4. पेरूidiva
मधुमेहाला नियंत्रित करण्याचे काम पेरू करते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी हे सर्वोत्तम फळ आहे. पेरूमध्ये ‘व्हिटॅमिन ए’ आणि ‘व्हिटॅमिन सी’ असते आणि पेरूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. या फळाचा ग्लुकोज इंडेक्सही कमी असतो.
5. बेरीshutterstock
बेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट्स असतात, त्यामुळे ते तुमच्या शरीराला मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. शरीरातील साखरेची पातळी निरोगी ठेवण्यासाठी, मधुमेही रुग्ण त्यांच्या आहारात बेरींचा समावेश करू शकतात. जसे की, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि ब्लॅकबेरी, रास्पबेरी, क्रॅनबेरी, चोकोबेरी इत्यादी.
हेही वाचा : त्वचा आणि केसांसाठी अंजीर आहे लाभदायी, जाणून घ्या फायदे
6. सफरचंदidiva
सफरचंदामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यामध्ये, पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करतात. सफरचंदातही पोषक तत्वे असतात जे चरबीच्या पचनास मदत करतात.
7. अननसshutterstock
अननस हे फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर फळ आहे. यासोबतच या फळाचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. कारण, या फळामध्ये अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरिअल, अँटी-इंफ्लेमेट्री आदी गुणधर्म असतात.
8. नाशपातीstock image
हे स्वादिष्ट फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेस्ट फळ आहे. यामध्ये जीवनसत्त्वे आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते, जे आपले आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
9. कलिंगडStock Image
जरी कलिंगडाची ग्लुकोज इंडेक्स क्षमता जास्त असली तरी त्यांचा ग्लायसेमिक भार हा कमी असतो. त्यामुळे, मधुमेही रुग्ण त्याचे सेवन करू शकतात. परंतु, केवळ संतुलित प्रमाणातच तुम्ही कलिंगडाचे सेवन करु शकता.
10. फणसidiva
बाहेरुन काटेरी असणाऱ्या आतून रसाळ असणारे फळ म्हणजे फणस होय. फणसामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, थियामिन, रायबोफ्लेविन, नियासिन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह, मॅंगनीज आणि मॅंग्नेशिअम सारखे अन्य पोषकतत्वे असतात. हे फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले आहे. कारण, हे फळ शरीरातील इन्सुलिनच्या पातळीमध्ये सुधारणा करते.
आम्ही आशा करतो की, तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल. जर तुम्ही कोणत्याही विषयावर आमच्याशी बोलू इच्छित असाल किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरे आम्ही नक्की देऊ. तुमचे प्रश्न तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करुन विचारु शकता.
हेही वाचा : काकडी खाण्याचे फायदे आणि तोटे