मुंबई नाशिक महामार्गावर आज सकाळी 7 वाजल्यापासून वाहतूक कोंडी झाली असून 2 तासानंतर देखील मुंबई नाशिक महामार्गांवरील जुन्या कसारा घाटातील वाहतूक कोंडी सुटत नाहीए. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांची दमछाक होत असून काही बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक सुरळीत होण्यास व्यत्यय येत आहे. पहाटेच्या सुमारास जुन्या कसारा घाटातील झिरो पॉईंट वळणावर एक कंटेनर पलटी झाला होता सदर कंटेनर पलटी झाल्याने एकेरी वाहतूक सुरू असतानाच एक मालवाहू ट्रक रस्त्यात बंद पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य व्हतूक कोंडी सोडविण्यासाठी जव्हार फाटा येथे पोहचले त्यांनी महामार्ग पोलिसाच्या मदतीने छोटी वाहने पर्यायी रस्त्याने वळवण्याचा प्रयत्न केला परंतु काही बेशिस्त वाहन चालकांमुळे ओव्हर टेकच्या घाईत तो रस्ता पण जाम करण्यात आला रविवार असल्याने प्रचंड गर्दी लक्षात घेता शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी कसारा पोलिसांना सूचना करीत वाहतूक कोंडी सोडविण्याचे आदेश दिले. कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील गावीत यांनी कसारा घाटात पोलीसाची कुंक पाठवून महामार्ग पोलीस घोटी केंद्र, आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य यांच्यासोबत मदत कार्य सुरू केले. तर रस्त्यात बंद पडलेला ट्रक, पलटी झालेला कंटेनर बाजूला घेण्यासाठी क्रेनच्या मदतीने टोल पेट्रोलिंग व पॉकेस प्रयत्न करीत आहेत. दरम्यान सकाळी 7 वाजल्यापासून वाहनचालक, विकेंड चा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांना वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागत असून मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. मार्गिकेवर 2 किलोमीटर पर्यंत रांगा गेल्या असून, ट्राफिक सुरळीत करण्यासाठी , कसारा पोलीस ठाण्याचे अधिकारी,कर्मचारी,महामार्ग पोलीस,घोटी ,आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य तब्बल 2 तास मेहनत घेत आहेत