Sanjay Raut was angry about Sanjay Gaikwad statement about voters PPK
Marathi January 07, 2025 09:24 AM


शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच काही ना काही वादग्रस्त विधान करत असतात. बुलढाणा जिल्ह्यातील जयपूर येथे दोन दिवसांपूर्वी एका सत्कार सोहळ्यात आमदार गायकवाड यांनी मतदारांसाठी आक्षेपार्ह शब्द वापरला. ज्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत संतापले आहेत.

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच काही ना काही वादग्रस्त विधान करत असतात. बुलढाणा जिल्ह्यातील जयपूर येथे दोन दिवसांपूर्वी एका सत्कार सोहळ्यात आमदार गायकवाड यांनी मतदारांसाठी आक्षेपार्ह शब्द वापरला. इतकेच नाही, तर त्यांनी मतदारांना शिवीगाळ सुद्धा केली. आमदार गायकवाड यांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण त्यांनी केलेल्या विधानामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत संतापले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेतील या आमदाराचा राजीनामा घ्यावा, असे राऊतांनी म्हटले आहे. (Sanjay Raut was angry about Sanjay Gaikwad statement about voters)

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एका सत्कार समारंभात भाषण करताना आमदारांना शिवीगाळ केली. “तुम्ही फक्त एक मत मला देऊ शकत नाही. फक्त दारू, मटण आणि पैसे. अरे दोन-दोन हजारात विकले गेले भाडXX साले. यांच्यापेक्षा तर रांX बऱ्या.” असे विधान आमदार गायकवाड यांनी केले. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सगळीकडे जोरदार व्हायरल करण्यात आला. याबाबत खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. राऊतांनी आज सोमवारी (ता. 06 जानेवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, मतदारांना जर कोणी वेश्या म्हणत असेल, लोकशाहीला कोणी रखेल म्हणत असेल, संविधानाला कोणी गुलाम मानत असेल आणि त्यातही ते सत्ताधारी पक्षाचे आमदार असतील तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ही त्यांची जबाबदारी आहे.

– Advertisement –

हेही वाचा… Sanjay Raut : प्रजासत्ताक दिन आला तरी पालकमंत्री नेमणूक रखडली, महायुतीत धुसफूस; संजय राऊतांचा आरोप

तसेच, दोन दोन हजारांना मतदार विकत घेऊन, त्यांना अशा प्रकारे अश्लील बोलणे, वेश्या बोलणे या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष, राज्यपाल यांनी मत व्यक्त केले पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे मतदारांना विकत घेण्यात आले, हे आम्ही आधीच सांगितले होते, असे यावेळी खासदार संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले. तर, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी लाडकी बहीण योजनेचे सरकारवर कशाप्रकारे ओझे आहे. सरकारवर दोन लाख कोटींचे कर्ज झाले आहे हे कोकाटे यांनी सांगितले. या योजना म्हणजे सरकारवर कशाप्रकारे ओझे होते, यासंदर्भात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. म्हणजे 1500 रुपये देऊन यांनी मत विकत घेतली. पण आता सरकारी तिजोरीवर भार टाकून राज्य चालवायला जमत नाहीये. हे यातून स्पष्ट दिसत असल्याचे मत राऊतांनी व्यक्त केले.

– Advertisement –

तर, शिंदे गटाचे जे आमदार आहेत, संजय गायकवाड यांनी केलेले विधान हे अधिक गंभीर आहे. या महाराष्ट्रातील कोट्यावधी मतदारांना जर कोणी वेश्या म्हणत असेल तर त्यांच्या नेत्यांनी म्हणजे एकनाथ शिंदेंनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. यांना मतदार वेश्या वाटतात. त्यांचे मत तुम्ही लोकांनी पैसे देऊन विकत घेतले असेल, हे मी मान्य करतो. पण तुम्ही त्यांना वेश्या म्हणत आहात. मी तुमचा गुलाम आहे का? असे अजित पवार म्हणत आहेत. पण यांना कोणत्या गोष्टीचे नैराश्य आले आहे, हे या राज्याला समजले पाहिजे, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.