Tahawwur Rana files petition in US Supreme Court to avoid extradition to India rrp
Marathi January 04, 2025 05:24 AM


2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी वॉन्टेड असलेल्या तहव्वूर राणाने भारताकडे होणारे आपले प्रत्यार्पण टाळण्यासाठी अखेरचा प्रयत्न सुरू केला आहे. राणाच्या वकिलाने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयावर फेरविचार करण्याचे आवाहन केले आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी तहव्वूर राणा हा 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी वॉन्टेड आहे. तो सध्या अमेरिकेच्या तुरुंगात असून त्याला लवकरच भारतात आणले जाण्याची शक्यता आहे. कारण राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकन न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. मात्र तहव्वूर राणाने भारताकडे होणारे आपले प्रत्यार्पण टाळण्यासाठी अखेरचा प्रयत्न सुरू केला आहे. राणाच्या वकिलाने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयावर फेरविचार करण्याचे आवाहन केले आहे. (Tahawwur Rana files petition in US Supreme Court to avoid extradition to India)

अमेरिकन सरकार देखील तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी तयार आहे. अमेरिकेचे सॉलिसिटर जनरल एलिझाबेथ बी. प्रीलोगर यांनी 16 डिसेंबरलाच सर्वोच्च न्यायालयात राणाची याचिका फेटाळण्याची विनंती केली होती. मात्र राणाच्या वकिलाने अमेरिकन सरकारच्या शिफारशीला आव्हान दिले आणि सर्वोच्च न्यायालयाला त्यांचे रिट याचिका मान्य करण्याची विनंती केली. राणाच्या वकिलाने याचिकेत दुहेरी धोक्याच्या तत्त्वाचा  (principle of double jeopardy) हवाला दिला आहे. हे तत्व एकाच गुन्ह्यासाठी दोनदा खटला चालवण्यास प्रतिबंध करते. राणाच्या याचिकेवर 17 जानेवारीला सुनावणी होणार आहे.

– Advertisement –

हेही वाचा – CJI : यावर्षात सर्वोच्च न्यायालयात असतील तीन सरन्यायाधीश, सात न्यायमूर्ती होणार निवृत्त

तहव्वूर राणाने कनिष्ठ न्यायालये आणि यूएस कोर्ट ऑफ अपीलसह अनेक फेडरल न्यायालयांमध्ये कायदेशीर लढाया गमावल्या आहेत. मात्र तरीही तो नव्या याचिकेद्वारे भारताकडे होणारे प्रत्यार्पण थांबवण्याचा शेवटचा प्रयत्न करताना दिसत आहे. तहव्वूर राणाने युक्तीवाद केला की, 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित आरोपावरून इलिनॉय (शिकागो) येथील फेडरल न्यायालयात खटला चालवण्यात आला होता आणि निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मात्र शिकागो न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या आरोपांच्या आधारावर भारत आता प्रत्यार्पणाची मागणी करत आहे.

– Advertisement –

तहव्वूर राणा सध्या लॉस एंजेलिस तुरुंगात

दरम्यान, 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह एकूण 166 लोकांचा मृत्यू झाला होता. धक्कादायक म्हणजे 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी या हल्ल्यावेळी 60 तासांहून अधिक काळ मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करून लोकांची हत्या केली. 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेला पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याच्याशी तहव्वूर राणाचा संबंध होता. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली असून सध्या तो लॉस एंजेलिस तुरुंगात आहे.

हेही वाचा – Bangladesh : बांगलादेशी हिंदूंना स्वतंत्र देश द्या; सततच्या अत्याचारामुळे ब्रिटन लेबर पार्टीच्या नेत्याची मागणी  



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.