भाजपच्या परिवर्तन रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "दिल्लीच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपला संधी द्या, असे मला दिल्लीतील जनतेला आवाहन करायचे आहे, भाजपच दिल्लीचा विकास करू शकतो. गेल्या 10 वर्षांत दिल्लीने पाहिलेली सरकार 'आप-डीए'पेक्षा कमी नाही, आता दिल्लीत 'आप-डीए नही देखेंगे' ऐकू येईल आणि दिल्लीच्या जनतेचा विश्वास आहे भाजप..."
Nagpur Live : आजपासून सदस्यत्व मोहिमेला नागपुरातून सुरुवात : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर आम्ही आजपासून सदस्यत्व मोहिमेला नागपुरातून सुरुवात केली आहे. आज सुमारे 1 लाख बूथवर आम्ही सदस्यत्व मोहीम सुरू केली आहे. आज मी 25 प्रमुख लोकांना पक्षाचे सदस्यत्व दिले आहे. आज नागपुरात... नागपुरात पहिल्या 2 तासात सुमारे 25,000 लोकांना सदस्यत्व देण्यात आले आहे..."
चंदगड तालुक्यातील कोवाड स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडल्याची घटना घडल्याचे समजले आहे. एटीएम फोडून चोरट्याने 18 लाख 77 हजार 300 रुपयांची रोकड लंपास केली आहे. चोरट्यांच्या भरधाव चार चाकी वाहनाने पोलिसांनी बॅरिगेट लावून केलेली नाकाबंदी उडवली.
पाठलागा दरम्यान पोलीस आणि चोरट्यांच्या गाडीची एकमेकांना जोराची धडकही झाली. पण धडकेनंतर चोरटे गाडी सोडून पैसे घेऊन पसार झाले आहेत. चंदगड पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चोरटे राजस्थानचे असल्याची प्राथमिक माहिती असून कोल्हापूर पोलिसांच्या क्राईम ब्रँच पथक चोरट्यांच्या शोधासाठी रवाना झाली आहे.
Pune Live: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दोषींना शिक्षा झाली पाहिजे - पृथ्वीराज चव्हाणमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दोषींना शिक्षा झाली पाहिजे. त्याचबरोबरच गुंतवणुकदारांना खंडणीखोरांचा त्रास झाला, तर ते राज्यात येणार नाही आणि सरकार टिकवण्यासाठी नेते व त्यांच्या निकटवर्तीयांना अभय मिळायला नको, असंही त्यांनी म्हटलंय
Pune Live: सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ पुण्यात जनआक्रोश मोर्चाला सुरुवातसरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात सकल मराठा समाजाकडून जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. यात देशमुख कुटुंबिय देखील सामील झाले आहे. लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे.
Pune Live : सरपंच हत्या प्रकरण : पुण्यातील जनआक्रोश मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवातपुण्यातील जनआक्रोश मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.
Maharashtra News Live : खासगी लक्झरी बसला भीषण आगपिंपरी चिंचवड शहरातील जगताप डेअरी चौका जवळ आज सकाळी सहा वाजता दरम्यान एका खासगी लक्झरी बसला भीषण आग लागली आहे.
Live : भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावातील शेतकऱ्याची तूर जळून खाकभातकुली तालुक्यातील गौरखेडा गावातील शेतकऱ्याची तूर जळून खाक
अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची प्राथमिक माहिती..
प्रशासनाने मदत देण्याची शेतकऱ्याची मागणी..
गौरखेडा गावातील कुलदीप ठाकरे नामक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
६ एकर शेती पैकी ४ एकरातील तुरीचे पीक जळून खाक
Nagpur Live : गोरेवाडा रेस्क्यू सेंटर मधील तीन वाघ, एका बिबट्याचा मृत्यूगोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील तीन वाघ आणि एका बिबट्याचा H5N1 ( बर्ड फ्ल्यु) ने मृत्यू झाल्याचा खळबळजनक अहवाल भोपाळ येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेतून प्राप्त झालाय
- H5N1 हा पक्षांमध्ये आढळणार विषाणू आहे. मात्र वाघ व बिबटयांना यांची लागण झाल्याने खळबळ उडली आहे.
- H5N1 मुळे वाघाच्या मृत्यू होण्याची ही राज्यातली पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.
- सध्या गोरेवाड रेस्क्यु सेंटर ला 12 वाघ व 24 बिबट्यांना ठेवण्यात आले आहे. त्यांना H5N1 लागण झाली नाही. मात्र संपूर्ण रेस्क्यू सेंटरचे रोज निर्जंतुकीकरण केले जात असून प्राण्यांमध्ये सोशल डीस्टंटसिंग पळाली जात आहे
Live : प्रतिमोर्चे काढले तर आम्हीं देखील तसंच उत्तर देवू - मनोज जरांगेमनोज जरांगे हे वंजारी समाजाचा अपमान करत असून त्याच्या निषेध म्हणून आम्ही मोर्चा काढू असा इशारा ओबीसी नेत्यांनी दिला होत्या त्याला आता मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जर ओबीसी नेत्यांनी मोर्चे काढले तर आम्ही प्रतिमोर्चे काढू असे ते म्हणाले.
OBC Live: ओबीसी नेत्यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा: प्रति मोर्चाची तयारी सुरूओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांत भेट घेणार असल्याची माहिती दिली आहे. वंजारी समाजाला ज्या पद्धतीने लक्ष्य केले जात आहे, त्यावर चर्चा करण्यासाठी ही भेट होणार आहे. दुसरीकडे, जरांगे पाटील यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाकडून प्रति मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. महसूल मंत्री सुरेश धस यांच्या कार्यकाळातील निर्णयांवरही चौकशी करण्याची मागणी अंजली दमानिया यांना करण्यात आली आहे.
Laxman Hake live: लक्ष्मण हाके यांची मनोज जरांगे यांच्यावर घणाघाती टीकामराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या वादात लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. "जरांगे घुसायची भाषा आम्हाला करू नका. जर तुमच्यात खरोखर दम असेल, तर कुठे घुसायचं ते सांगा," अशी चिथावणीखोर टिप्पणी करत हाके यांनी संताप व्यक्त केला. अशा वक्तव्यांमुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अशा व्यक्तींच्या वक्तव्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हाके यांनी केली आहे.
कोयना परिसराला पुन्हा भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणकोयनानगर परिसरात आज सकाळी 6:56 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर 2.4 तीव्रतेचा हा धक्का नोंदवण्यात आला असून, भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 9.6 किमी अंतरावर होता. गोषटवाडी गावाच्या नैऋत्येला सुमारे 5 किमी अंतरावर असलेल्या या केंद्रबिंदूची खोली 7 किलोमीटर इतकी असल्याचे समजते. या सौम्य धक्क्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नसली, तरी स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Maharashtra: आरोग्य मित्र करणार काम बंद आंदोलनआरोग्य मित्रांना वेतन द्या अन्यथा काम बंद आंदोलन करू असा इशारा आरोग्य मित्र संघटनांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटना यांच्या वतीने मोठा निर्णय घेण्यात आलाय. आरोग्य मित्रांना किमान वेतन कायद्यानुसार पगार न दिल्यास राज्यभर काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mumbai Live: गोडाऊनच्या आगीत चित्रीकरणाची वाहने खाकमालाड पश्चिमेतील धारवली डोंगरपाढा येथे गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत चित्रीकरणाची दोन वाहने जळून खाक झाली. ही घटना शनिवारी सकाळी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेबाबत कळताच अग्निशमन दलाने तत्काळ कारवाई करीत आग आटोक्यात आणली. सध्या या प्रकरणाचा तपास मालवणी पोलिस करीत आहेत.
Nagpur: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यभरातील सात उड्डाणपुलाचे लोकार्पण करणारनागपूर
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यभरातील सात उड्डाणपुलाचे लोकार्पण करणार
- राज्यातील वाहतूक सुविधा बळकटी करणात भर पडणार...महाराष्ट्र रेलकडून निर्माण केलेल्या राज्यभरातील सात उडाणपूलाच लोकार्पण होणार..
- रामदास पेठ परिसरातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानावर होणार लोकार्पण सोहळा.
Nagpur: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ विस्तारीकरण कामाला मिळणार गतीडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ विस्तारीकरण कामाला आता गती मिळणार
- वायुदलाकडील जमीन नवीन जागेवर स्थलांतरित होण्यासाठी संबंधित कामांची पूर्तता करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले
- जिल्हाधिकारी तथा एमएडीसी चे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. इटनकर यांनी भारतीय वायुदलाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली