टोमॅटोची लाली उतरली! 6 दिवसात दरात 9 रुपयांची घसरण, बळीराजाला फटका तर  ग्राहकांना दिलासा
Marathi January 07, 2025 07:25 PM

टोमॅटोची किंमत: देशातील ग्राहकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात बटाटे आणि टोमॅटोच्या किमतीत 3 ते 9 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. याचा फटका मात्र, शेतकऱ्यांना बसला आहे. तर दुसरीकडे जानेवारी महिन्यात कांद्याच्या भावात 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

काय सांगतो क्रिसिलचा अहवाल?

नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात घरातील खाद्यपदार्थाच्या किमती 3 टक्क्यांनी स्वस्त झाल्या आहेत. बटाटे आणि टोमॅटोच्या भावात झालेली घसरण हे त्याचे प्रमुख कारण आहे. आता हाच ट्रेंड जानेवारीतही कायम राहण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यात बटाटे आणि टोमॅटोचे दर तीन ते नऊ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. दुसरीकडे जानेवारी महिन्यात कांद्याच्या दरात आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जे कमी होण्याची अपेक्षा आहे. जानेवारीच्या पहिल्या 6 दिवसांत बटाटे, कांदे आणि टोमॅटोच्या किमतीत किती घसरण झाली आणि किती वाढ झाली हेही पाहू.

ग्राहक मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशाची राजधानी दिल्लीत बटाट्याच्या किंमतीत 10 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 31 डिसेंबर रोजी दिल्लीत बटाट्याची किरकोळ किंमत 30 रुपये प्रति किलो होती. जी 6 जानेवारीला 27 रुपये कमी झाली आहे. याचाच अर्थ दिल्लीत बटाट्याच्या किमतीत 10 टक्के  घट झाली आहे. देशातील सरासरी किमतींबाबत बोलायचे झाले तर 31 डिसेंबर रोजी देशात बटाट्याचा भाव 33.84 रुपये प्रति किलो होता. जे 33.32 रुपये प्रति किलोपर्यंत कमी झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत देशातील सरासरी किमती आणखी घसरण्याची शक्यता आहे.

टोमॅटोच्या दरात कमालीची घट

दुसरीकडे टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, जानेवारी महिन्यात दिल्लीत टोमॅटोच्या दरात प्रतिकिलो 9 रुपयांची घसरण झाली आहे. 31 डिसेंबरला टोमॅटोचा भाव 37 रुपये किलो होता. 6 जानेवारीला टोमॅटोचे दर 28 रुपये किलोवर आले आहेत. म्हणजेच टोमॅटोच्या किमती 24.32 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. जर आपण देशाबद्दल बोललो तर 31 जानेवारी रोजी देशात टोमॅटोची सरासरी किंमत 39.08 रुपये प्रति किलो होती. जे प्रति किलो 34.97 रुपये कमी झाले. याचा अर्थ असा की, 6 दिवसांत देशातील सरासरी भावात 4.11 रुपये प्रति किलोची घट झाली आहे.

कांदा महागला

जानेवारी महिन्यात आतापर्यंत कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. कांद्याचे भाव 6 दिवसांत 8 टक्क्यांनी महागले आहेत. 31 डिसेंबरला दिल्लीत कांद्याचा भाव 37 रुपये किलो होता, तो वाढून 40 रुपये किलो झाला. याचाच अर्थ कांद्याच्या दरात तीन रुपयांनी वाढ झाली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, 31 डिसेंबर रोजी देशातील सरासरी किमती 33.84 रुपये प्रति किलो होत्या, त्या 33.32 रुपये प्रति किलोवर आल्या. याचा अर्थ देशाच्या सरासरी किमतींमध्ये थोडीशी घट झाली आहे.

डिसेंबरमध्ये टोमॅटो किती स्वस्त?

क्रिसिलच्या अहवालानुसार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधून आलेल्या ताज्या पुरवठ्यामुळे टोमॅटोचे भाव 12 टक्क्यांनी घसरले,आहेत. तर बटाट्याचे भाव दोन टक्क्यांनी घसरले आहेत. वार्षिक आधारावर बोलायचे झाले तर डिसेंबरमध्ये टोमॅटोच्या भावात 24 टक्क्यांनी वाढ झाल्याने टोमॅटोचा भाव 47 रुपये किलो झाला होता. बटाट्याच्या दरात 50 टक्क्यांनी वाढ झाली असून 36 रुपये किलोचा भाव आहे.

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.