पुणे शहरात कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा गेल्यावर्षी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कोथरूड येथील सुतारदरा भागात मोहोळवर त्याच्या घराजवळच गोळ्या झाडल्या होत्या. या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या दोन जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.शरद मालपोटे आणि संदेश कडू अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन पिस्तुलही जप्त करण्यात आले आहेत.
...म्हणून मोहोळच्या आमदारानं काळे कपडे घालून केला जलसंपदा मंत्री विखेंचा सत्कारविधानसभा निवडणूक काळात मोहोळ विधानसभेत अनगर अप्पर तहसील कार्यालयाचा मुद्दा गाजला होता. त्याची आठवण करून देण्यासाठी मोहोळचे आमदार राजू खरे यांनी खास काळे कपडे घालून विखे पाटलांचा सत्कार केला.राधाकृष्ण विखे पाटील हे मागच्या सरकारमध्ये महसूल मंत्री असताना त्यांनी अवघ्या 9 दिवसांत अनगरला तत्परतेने अप्पर तहसील कार्यालय दिलं होतं. त्यामुळे त्यांना याची जाणीव करून देण्यासाठी काळे कपडे घालून आलो असल्याची खरे यांनी सांगितलं.
बीडमध्ये माणुसकीचं दर्शन! लोकवर्गणीतून 44 लाख 13 हजार 488 रुपयांची देशमुख कुटुंबाला मदतमाजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मोठी बातमी दिली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात म्हणून लोकवर्गणीतून जमा झालेले 44 लाख 13 हजार 488 रुपये सुपुर्द केले आहेत. आणखी तीन ते चार दिवसांमध्ये जो निधी गोळा होईल तोही आम्ही देशमुख कुटुंबाला आणून देणार आहोत, अशी माहिती आमदार सोळंके यांनी दिली आहे.
नाशिक मनपा आयुक्त मनीषा खात्री यांचा मोठा निर्णय!बांधकाम परवानग्या ऑनलाईनच...नाशिक मनपा आयुक्त मनीषा खात्री यांनी नगररचना विभागाला महत्त्वपू्र्ण सूचना दिल्या आहेत. त्यांनी शुक्रवारी (ता.3) परिपत्रक काढत नगररचना विभागास सर्व परवानग्या ऑनलाईनच देण्यात याव्यात यासंबंधीचे आदेश दिले आहेत. यापूर्वी विकासकांना ऑफलाईन बांधकाम परवानग्या दिल्या जात होत्या. महापालिकेतील भ्रष्टाचार टाळण्यासाठी मनपा आयुक्तांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
Delhi Vidhan Sabha Election : दिल्ली विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून कालकाजी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणाआगामी दिल्ली विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून कालकाजी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा. कालकाजी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून अलका लांबा यांची उमेदवारी जाहीर. अलका लांबा यांची लढत आपच्या उमेदवार मुख्यमंत्री अतिशी यांच्याशी होणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी दिल्ली विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.
Chhagan Bhujbal : चाकणमध्ये शरद पवार छगन भुजबळ एकाच मंचावरचाकणमध्ये महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. त्यानंतर राम कांडगे यांच्या निवास्थानी शरद पवारांसोबत छगन भुजबळ एकत्र. कौटुंबिक चर्चा आणि आणि जुन्या आठवणीचा राम कांडगे सोबत चर्चा.
Bacchu Kadu : माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा....माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे राजीनामा....दिव्यांगांना अजूनही अनेक गोष्टी मिळत नसल्याच्या नाराजीमुळे राजीनामा दिला आहे. या विषयी बोलतांना बच्चू कडू म्हणाले की, या पदावर राहून मला आंदोलन करता येणार नाहीत आणि दिव्यांगांशी बेमानी शक्य नाही असं लिहून बच्चू कडू यांनी आपला राजीनामा एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला आहे. तसेच सुरक्षा देखील काढून घेण्यासंदर्भात आवाहन केले आहे.
Congress New campaign begins today : काँग्रेसच्या जय-बापू, जय-भीम, जय-संविधान अभियानाला आजपासून सुरुवातकाँग्रेसच्या जय बापू, जय भीम, जय संविधान अभियानाला आज शुक्रवारपासून देशभरात सुरुवात होणार आहे. डॉ. भीमराव आंबेडकर यांचे जन्मस्थान असलेल्या मध्य प्रदेशातील महू येथे 26 जानेवारी रोजी या अभियानाचा समारोप होणार आहे.
Satara Devendra Fadanvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव’ कार्यक्रमाला उपस्थितीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती'निमित्त आज नायगाव, सातारा येथील त्यांच्या जन्मघरास भेट देत सावित्रीबाई यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले.
नितेश राणे यांनी ससून डॉक येथील विविध कामांची पाहणी केली असून, ससून डॉकमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
तसेच ससून डॉक परिसरातील पायाभूत सुविधांची कामे विहीत कालावधीत करावेत, असे निर्देश ससून डॉक येथे पाहणी करताना मंत्री नितेश राणे यांनी दिले.
Nanded News : नांदेड बॉम्बस्फोटाचा उद्या निकाल; निकालाकडे सर्वांचे लक्ष.उद्या नांदेड बॉम्बस्फोटाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. नांदेड न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार असून या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 06/04/2007 मध्ये नांदेड शहरातील पाटबंधारे नगरमधील नरेश राजकोंडवार याच्या घरी बॉम्बब्लास्ट झाला होता.या घटनेने संपूर्ण नांदेड जिल्ह्या हादरला होता. हे प्रकरण सीबीआयकडे असून नांदेड न्यायालयात हे प्रकरण सुरु आहे.
Sand Mafia : राज्यातील वाळू माफियांवर आळा घालणार : बावनकुळेराज्यातील वाळू माफियांवर आळा घालण्यासाठी नवे धोरण आखले जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. या धोरणानुसार गौण खनिजासंबंधीचे सर्व अधिकार थेट जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणार आहेत.
Union Agriculture Minister Shivraj Singh Chauhan : केंद्रीय कृषिमंत्र्यांचे अजित पवार यांच्या नेत्याला दिल्लीचे आमंत्रणकेंद्रीय कृषिमंत्र्यांनी राज्याचे कृषिमंत्री कोकाटे यांना दिल्लीला येण्याचे आमंत्रण दिले आहे. त्यांनी, आपण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र बसू. तुम्ही तुमची टीम घेऊन दिल्लीला या. आपण अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय तोडगा काढायचा तो निर्णय घेऊ, असे म्हटले आहे
Maharashtra BJP : भाजप दोन महिन्यात प्रदेशाध्यक्ष नियुक्त करणार, हालचालींना वेगविधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निवडूण आले असून आता ते मंत्री झाले आहेत. यामुळे भाजप राज्यात लवकरच भाकरी फिरवणार असून प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षपदी नवा चेहरा मार्च महिन्यात निवडणार आहे. याआधी बुथ प्रमुख, तालुका प्रमुख व जिल्हा प्रमुखांच्या निवडी होणार आहेत.
CM Devendra Fadnavis : ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंनी विषमता दूर करुन समतेच बीज रोवलेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव येथे जाऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी, सावित्रीबाई फुलेंना अतिशय वाईट वागणूक सहन करावी लागली होती. त्यांनी विषमता दूर करुन समतेच बीज रोवलं. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंचे हे उपकार आपण विसरु शकत नाही” असे फडणवीस म्हणाले.
Walmik karad Live News : कोठडीत 24 तास अस्टिटंट हवा, वाल्मिक कराडची मोठी मागणीWalmik karad Live News: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला जात असलेल्या वाल्मिक कराडला न्यायालयाने सीआयडी कोठडी सुनावली आहे. अशातच आता त्याने कोठडीत 24 अस्टिटंट पाहिजे अशी मागणी केली आहे.
Sunil Tatkare On Beed Guardianship Live : बीडच्या पालकमंत्रिपदाबाबत अजितदादांशी चर्चा करणार - सुनील तटकरेराष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे हे मागील सरकारमध्ये बीडचे पालकमंत्री होते. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचे नाव सातत्याने चर्चेत आल्यामुळे यंदा त्यांचा या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट होणार असल्याची शक्यता आहे. अशातच आता बीडचे पालकमंत्री अजित पवार होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत अजित पवारांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे.
Supriya Sule Live News : सरकारमध्ये केवळ CM फडणवीसच सक्रिय दिसतात - सुप्रिया सुळेमहायुती सरकारमध्ये केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सक्रिय दिसतात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. त्यामुळे आजच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील अग्रलेखानंतर शरद पवारांच्या पक्षाकडूनही मुख्यमंतत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळत आहे.
Chhatrapati Sambhajinagar Live News : ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का!छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे माजी महापौर आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे नंदकुमार घोडेले आणि त्यांच्या पत्नी माझी महापौर अनिता घोडेले या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 1995 पासून घोडेले संभाजीनगर महापालिकेवरती नगरसेवक आहेत. यावेळी संभाजीनगर मध्य मतदारसंघासाठी त्यांचे नाव चर्चेत होते. अशातच आता ते ठाकरेंची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितित शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
Navi Mumbai Firing Live : नवी मुंबईत 5 ते 6 राऊंड फायरिंगनवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सानपाडा डिमार्टजवळ एका व्यक्तीने पाच ते सहा राऊंड फायरिंग केली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. तर फायरिंग केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सानपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर ही फायरिंग बाईकवरून आलेल्या दोघांनी केल्याची माहिती आहे.
Beed Murder Case Live Update : धनंजय देशमुख यांना पोलिस संरक्षणमस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना पोलिस संरक्षण देण्यात आलं आहे. बाहेरगावी जाताना त्यांच्यासोबत आता गार्ड असणार आहे. देशमुख कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्याची मागणी मस्साजोग ग्रामस्थांकडून केली जात होती. त्यानुसार पोलिस अधीक्षकांनी मागणी मान्य करत आता त्यांना संरक्षण दिलं आहे.
Atul Save Live News : फुले दांपत्याला भारतरत्न मिळावा यासाठी पाठपुरावा करणारसावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना भारतरत्न मिळावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती भाजप आमदार अतुल सावे यांनी दिली आहे. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांनी ही माहिती दिली आहे. तसंच यावेळी त्यांनी राजकीय भाष्य करत फडणवीसांच्या कामाचं कौतुक सामना सारखं वृत्तपत्र करत असले तर त्यातच सगळं आलं असं म्हटलं आहे. शिवाय नक्षलवादी जिल्हे नक्षलमुक्त करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतील, असा विश्वासही सावे यांनी यावेळी व्यक्त केला.
Shivraj Singh Chouhan : देशाचे आणि राज्याचे कृषीमंत्री आज एकत्रराज्य-केंद्रीय कृषीमंत्रीआज शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज सिंह चौव्हान यांच्यासोबत राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे देखील असणार उपस्थित राहणार आहेत. देशाचे आणि राज्याचे कृषीमंत्री आज एकत्र येत असल्याने कांदा निर्यात शुल्कासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. कांदा निर्यात शुल्क पूर्णपणे हटवण्याची मागणी गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. दोन्ही कृषी मंत्र्यांमध्ये चर्चा होऊन कांदा निर्यातीबाबत आज काही सकारात्मक निर्णय होणार का? याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Delhi Collage Named Vinayak Savarkar : सावरकरांचे नाव काँलेजला देण्यास काँग्रेसचा विरोधदिल्ली विद्यापीठ संकुलाचा विस्तार होत आहे. यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावानं एका महाविद्यालयाचे भूमिपूजन आज होत आहे. सावकर यांचे नाव कॉलेजला देण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. दिवंगत पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांचे नाव या महाविद्यालयास नाव द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सावरकरांचे नाव दिल्यास काँग्रेसने विरोध करणार असून याबाबत आक्रमक भूमिका घेणार आहे.
Solapur Vande Bharat Train stone Pelting: सोलापूरमध्ये वंदे भारत ट्रेनवर दगडफेकसोलापूरमध्ये वंदे भारत ट्रेनवर दगडफेक झाली असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. जेऊरजवळ हा प्रकार घडला. या दगडफेकीमध्ये वंदे भारत एक्सप्रेसच्या सी-11 डब्ब्याची काच फुटली. ही दगडफेक कोणी आणि का केली याबद्दलची माहिती मिळू शकली नाही. रेल्वेचे अधिकारी आणि सोलापूर पोलिस याबाबत तपास करीत आहेत.
Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे घेणार देशमुख कुटुंबियांची भेटशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज मस्साजोगच्या दौऱ्यावर आहेत. मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहे. देशमुख हत्या प्रकरणाचा आढावा ते घेणार आहे.
CM Devendra Fadnavis:माऊलींच्या दर्शनासाठी फडणवीस आज आळंदी दौऱ्यावरआळंदी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी दीड वाजता आळंदीत संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधी दर्शनासाठी येत आहेत. स्वामी गोविंददेवगिरी संचलित वेदश्री तपोवन या वेदपाठ शाळेतील कार्यक्रमासाठी समाधी दर्शनानंतर डुडुळगाव येथे ते जाणार आहेत.