ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 5वी कसोटी थेट क्रिकेट स्कोअर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील शेवटची कसोटी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळली जात आहे. हा सामना 3 जानेवारीपासून सुरू झाला असून दुसऱ्या दिवसाचा खेळही भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजता सुरू झाला होईल. पहिल्या दिवशी भारताचा पहिला डाव 185 धावांवरच आटोपला होता. आता ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करत आहे.
सिडनी कसोटीत पहिल्या दिवशी गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले, त्यामुळे भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसले. टीम इंडियाकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 40 धावा केल्या. त्याच्याशिवाय रवींद्र जडेजाने 26 आणि जसप्रीत बुमराहने 22 धावांचे योगदान दिले. तर ऑस्ट्रेलियाचा स्कॉट बोलंडने एकूण 4 भारतीय फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पहिल्या दिवसअखेर भारताने ऑस्ट्रेलियाची एक विकेटही घेतली होती.
आता दुसऱ्या दिवशी लवकरात लवकर विकेट्स घेत भारताला ऑस्ट्रेलियाला आघाडी घेण्यापासून रोखायचे आहे. खेळपट्टीवर गवत असल्याने गोलंदाजांना मदत मिळत आहे, त्यामुळे येथे धावा करणे सोपे नाही. रोहित शर्मा या सामन्यात खेळत नाही, त्याच्या जागी जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा कर्णधार आहे.
जसप्रीत बुमराहने मोडला 47 वर्ष जुना विक्रम
जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चालू मालिकेत आतापर्यंत 32 विकेट घेतले आहेत. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या इतिहासात एकाच मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. तो आता ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या कोणत्याही एका मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. याआधी हा विक्रम सध्या बिशन सिंग बेदी यांच्या नावावर होता, ज्यांनी 1977-78 च्या मालिकेत एकूण 31 बळी घेतले होते.