Latest Maharashtra News Updates : पंचकल्याणक पूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदणीला भेट देणार
esakal January 06, 2025 01:45 PM
पंचकल्याणक पूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदणीला भेट देणार

पंचकल्याणक पूजेसाठी आज (ता. ६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदणीला भेट देणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांनी कामाचा आढावा घेतला. नांदणी येथे मुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी पंचकल्याणक पूजा समितीच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांनी या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन पूजा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Bike Accident LIVE : मोटारसायकलच्या धडकेत शिरोलीत तीन मजूर जखमी

नागाव : मोटारसायकलच्या धडकेत तिघे बांधकाम मजूर जखमी झाले. मायाप्पा हणमंता अलकुंटे (वय ५०), रामाप्पा भीमाप्पा गाडीवडर (वय ६०, दोघेही रा. शिवनेरी कॉलनी, इंदिरानगर, नागाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) व तुकाराम सिद्धाप्पा जनगेकर (वय ४२, रा. यादववाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत. पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील दत्त मंदिरसमोर शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला.

Pune Airplane LIVE : दाट धुक्यामुळे तब्बल 32 विमानांना उशीर

दिल्लीतील दाट धुक्याचा परिणाम विमान सेवेवर होत आहे. यामुळे अनेक विमानांना उशीर होत आहे. शनिवारी दिल्लीहून येणाऱ्या आणि पुण्यातून जाणाऱ्या तब्बल ३२ विमानांना उशीर झाला, तर रविवारीदेखील काही विमानांना धुक्याचा फटका बसला आहे. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळच्या सुमारास दिल्लीत दाट धुके पडले होते. यामुळे दिल्लीहून जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांना फटका बसला आहे.

Maharashtra Kesari Competition LIVE : महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा; 'या' दिवशी अहिल्यानगरात होणार स्पर्धा

Latest Marathi Live Updates 6 January 2025 : अधिकृत महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणती, या विषयाभोवती चर्चेचे गुऱ्हाळ रंगलेले असताना, नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा केली आहे. येत्या २९ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान अहिल्यानगरात ही स्पर्धा होणार आहे. तसेच अनगोळ येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे अनावरण दिमाखदार सोहळ्याद्वारे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते रविवारी (ता. ५) करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेली मिरवणूक लक्षवेधी ठरली. पोरबंदर येथे भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पंचकल्याणक पूजेसाठी आज (ता. ६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदणीला भेट देणार आहेत. त्याचबरोबर गेल्या चार दिवसांपासून राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.