नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरातील धक्कादायक प्रकार.....
नोकरीचे आमिष देत बेरोजगार तरुणाला भामट्यांनी लावला 12 लाख 50 हजारांचा चुना....
फसवणुकीचा प्रकारात एका पोलीस अधिकाऱ्याच्या भाऊ असल्याची माहिती...
जेवणाच्या ताटाला रोटीच पाहिजे म्हणून कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायिकाला बेदम मारहाणजेवणाच्या ताटाला रोटीच पाहिजे या कारणावरून झाला वाद
11 तरुणांनी हॉटेल मालकाला केली मारहाण
हॉटेल मालक महिलेसह तिघेजण जखमी
Maharashtra Live Update: पुण्यात आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाचा व्हिडिओ केला रेकॉर्डपिंपरी चिंचवड शहरात एका तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एका ऑटो रिक्षा चालक तरुणाने एक व्हिडियो तयार करून तो व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे
Maharashtra Live Update: विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा आज सर्वपक्षीय सत्कार...विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा आज नगरमध्ये होणार सर्वपक्षीय सत्कार...
खासदार निलेश लंके आणि कर्जत-जामखेडचे महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार उपस्थित राहणार की नाही याची उत्सुकता....
Maharashtra Live Update: संतोष देशमुख खून प्रकरण... पुण्यातून घुले आणि सांगळेच्या मुसक्या आवळल्याबीड पोलिसांच्या विशेष पथकाने दोघांना पुण्यातून उचलले
अधिक तपासासाठी सीआयडी च्या ताब्यात देणार
पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद, दोन आरोपी मात्र फरारनांदेड शहरात मागिल काही दिवसापासून जबरी चोरी आणि लुटमारीच्या घटनेत वाढ झालीय.
त्यांच पार्श्वभूमीवर पोलिसांनी राबविलेल्या ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केलीय.
नांदेड जिल्ह्यात पुन्हा थंडीचा जोर वाढला...नांदेड जिल्ह्यात तापमानात पुन्हा घसरण झालीय.नांदेड जिल्ह्यात 13 अंश सेल्सिअस एव्हढ्या कमी तापमानाची नोंद झालीय.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, तिन्ही फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्यासंतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार ३ पैकी २ आरोपींना पकडल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती.
तर अन्य एकाला देखील ताब्यात घेतल्याची माहिती..
त्याने देखील आरोपींना फरार होण्यासाठी मदत केल्याची माहिती..
काही वेळात पोलीस अधीक्षक पत्रकारांशी साधणार संवाद
Maharashtra Live Update: धुळ्यात थंडीचा जोर पुन्हा वाढलाधुळ्यात थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे, धुळ्यात आज 6.8° इतक्या निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे, गेल्या काही दिवसापासून धुळ्यात थंडीचा जोर कमी झाला होता, परंतू आता पुन्हा एकदा तापमानाचा पारा हळूहळू घसरतांना दिसुन येत आहे,
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी धुळ्यात तापमानाचा पारा 4 औंशा पर्यंत घसरला होता, परंतु त्यानंतर तपमानात पुन्हा बदल होत थंडीचा जोर कमी झाला होता, परंतु आता पुन्हा एकदा तापमानाचा पारा हळूहळू घसरत असल्याने धुळेकरांना वाढत्या थंडीचा सामना करावा लागत आहे.
सांगली.. भिलवडी येथे ७ एकर ऊस आगीत भस्मसात.सांगलीच्या भिलवडी येथील हाळभागात शेतातील ऊसाला अचानक आग लागली. या आगीत सुमारे सात एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. भिलवडी येथील शेतकरी जयवंत जोशी, कुमार वठारे, सना सुतार, बबन मगदूम,अण्णाप्पा मगदूम,सुधीर चौगुले, सुलतान डिग्रजे यांच्यासह आदी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे..
काल दुपारच्या सुमारास उसाला अचानक आग लागली. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने शेताकडे धाव घेतली. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर चितळे यांच्या अग्निशामकच्या गड्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. तोपर्यंत ऊस जळून खाक झाला होता. त्यामुळे शेतकऱ्याचे सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले.