दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात पहिला कसोटी सामना हा न्यूलँड्स केपटाऊन येथे होत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या रायन रिकेल्टन याने पहिल्या दिवसानंतर आता दुसऱ्या दिवशीही धमाका केला आहे. रायन रिकेल्टन याने पहिल्या दिवशी शतक ठोकलं. रायन यासह नववर्षातील पहिला शतकवीर ठरला. त्यानंतर आता रायनने दुसऱ्या दिवशी द्विशतक झळकावलं आहे.रायनने यासह इतिहास घडवला आहे. रायन यासह दक्षिण आफ्रिकेसाठी 2016 नंतर द्विशतक करणारा पहिला फलंदाज ठरला.
हाशिम अमला याने दक्षिण आफ्रिकेसाठी 2016 साली अखेरचं द्विशतक केलं होतं. त्यानंतर आता रायनने 9 वर्षांची प्रतिक्षा संपवली आहे. रायनने 93 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर सिंगल घेत द्विशतक पूर्ण केलं. रायनने 75.19 च्या स्ट्राईक रेटने 266 बॉलमध्ये 200 धावा पूर्ण केल्या. रायनच्या कसोटी कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं द्विशतक ठरलं.
तसेच रायन दक्षिण आफ्रिकेसाठी 2013 नंतर ओपनर म्हणून द्विशतक करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी माजी कर्णधार ग्रेम स्मिथ याने 2013 साली पाकिस्तानविरुद्धच द्विशतक केलं होतं. स्मिथने तेव्हा 16 चौकारांसह 234 धावांची खेळी केली होती. स्मिथच्या या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने तेव्हा पाकिस्तानवर डाव आणि 92 धावांनी विजय मिळवला होता.
रायन रिकेल्टन याची द्विशतकी खेळी
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, विआन मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि क्वेना माफाका.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : शान मसूद (कर्णधार), सैम अयुब, बाबर आझम, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सलमान आगा, आमेर जमाल, मीर हमजा, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अब्बास