अजितदादा क्या हुआ तेरा वादा, कायको इसको अंदर लिया, असं म्हणत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच, धनंजय मुंडे यांच्याऐवजी प्रकाश सोळंके किंवा राजेश विटेकर यांना मंत्रिपद देण्यासाठी विनंती अजितदादांना केली होती, असंही सुरेश धस यांनी सांगितलं आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्यासाठी परभणीत आयोजित केलेल्या मूकमोर्चात ते बोलत होते.
सुरेश धस म्हणाले, “संतोष देशमुख यांच्या मारहाणीचा व्हिडिओ आकाला 100 टक्के दाखवला असेल. मात्र, आकाच्या आकानं पाहिला असेल, तर करलो जल्दी तयारी हम निकले है जेलवारी… सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली, असा काहीसा प्रकार परवा घडला. आकाचे आका आले आणि म्हणाले, ‘जे-जो दोषी असतील त्यांना फाशी द्या.’ मग, आधी त्यांना निट वागायला कुणी सांगायचे होते?”
– Advertisement –
हेही वाचा : “मुंडे-फिंडेसारख्या हरा***** अवलादीचं आम्ही नाव घेत नाही, पण…”, जरांगे-पाटलांचा थेट इशारा
अजितदादा क्या हुआ तेरा वाद, कायको असको अंदर लिया.. ये अंदर लैने जैसा नही है.. दिघोळेपासून संतोष देशमुखपर्यंतच्या हत्येचा हिशोब अजितदादांनी करावा. या हत्या कुणी केल्या? याचा मास्टरमाइंड कोण होता? हे उद्योग कुणी केले? हे तपासण्यासाठी बारामतीचे लोक परळी किंवा परभणीत पाठवा,” असं सुरेश धस यांनी म्हटलं.
– Advertisement –
“माझ्या पक्षाकडून मला मंत्रिपद मिळत नाही. त्याऐवजी बीडमधून प्रकाश सोळंके किंवा परभणीतून राजेश विटेकर यांना मंत्री करा. त्यांनाही जमत नसेल, तर मनोज कायंदे यांना मंत्री करा, असं अजितदादांना सांगितले होते. राजेश विटेकरांनी सगळ्यांसोबत जावं. आमचा जिल्हा राष्ट्रवादीकडून बिनमंत्र्याचा राहुद्या. अन्यथा लोक अजितदादांना क्या हुआ तेरा वादा, असा प्रश्न विचारतील,” असं म्हणत धस यांनी मुंडेंवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा : “अजितदादांनी मुंडेंना ‘चल जा गावाला’ सांगितलं पाहिजे होते, मात्र…”, नरेंद्र पाटलांनी सडकून काढलं