गौतम गंभीर टीम इंडिया: बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. यासोबतच भारताने मालिकाही गमावली आणि टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीच्या शर्यतीतूनही बाहेर पडली. टीम इंडियाच्या मोठ्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गौतम गंभीरने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून भारतीय संघाला अनेक लाजिरवाणे क्षण पाहावे लागले आहेत.
गौतम गंभीर जेव्हापासून टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे, तेव्हापासून टीम इंडियाची कामगिरी सुधारण्याऐवजी खालावली आहे. आधी, त्याच्या प्रशिक्षणाखाली संघाने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका गमावली. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावर 0-3 असा पराभव पत्करावा लागला. आता बॉर्डर गावसकर ट्रॉफीही हरली. इतकंच नाही तर टीम इंडियामध्ये फुट पडली अश्या बातम्या येत होत्या, कारण अनेक खेळाडूंना गौतम गंभीरची कोचिंग स्टाईल आवडत नाही. ज्याचा परिणाम आता मैदानावरील कामगिरीवर दिसून येत आहे.
भारतीय संघाला अवघ्या तीन दिवसांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. सामना हरल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाला की, परिवर्तनाबद्दल बोलणे खूप घाईचे आहे, आम्हाला माहित नाही की आम्ही 5 महिन्यांनंतर कुठे असू. कारण भारतीय संघाला आता पुढील कसोटी मालिका जून-जुलैमध्ये इंग्लंडमध्ये खेळायची आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मण होणार प्रशिक्षक?
यादरम्यान आता वृत्त समोर येत आहे की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ पाच कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला जाणार आहे. ही मालिका नव्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सायकलची सुरुवात असेल. अशा स्थितीत लक्ष्मणकडे कसोटी संघाचे प्रशिक्षकपद सोपवले जाणार असे बोल्या जात आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण हे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख आहेत, ते अनेकदा टीम इंडियासोबत छोट्या मालिकांमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून जातात, परंतु लवकरच त्यांना मोठी भूमिका मिळू शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
टाइम्स नाउच्या एका वृत्तात पीटीआयच्या हवाल्याने म्हटले आहे की, राहुल द्रविडनंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनण्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण बीसीसीआयची पहिली पसंती होती. बीसीसीआयनेही मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी अनेक परदेशी दिग्गजांशी संपर्क साधला होता, परंतु तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनण्याची कोणालाच इच्छा नव्हती. त्यानंतर गंभीरला बनवण्यात आले.
हे ही वाचा –
अधिक पाहा..