अमोल कीर्तिकर यांना मातृशोक, मेघना कीर्तिकर यांचे निधन
Marathi January 05, 2025 04:25 PM

शिवसेनेचे अमोल कीर्तिकर यांच्‍या आई मेघना कीर्तिकर यांचे रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी पहाटे 3.30 वाजता निधन झाले. त्यांचे वयाच्‍या 82व्‍या वर्षी अल्‍पश: आजाराने दु:खद निधन झाले. अंत्यदर्शनासाठी मेघना कीर्तिकर यांचे पार्थिव  संध्याकाळी 4 ते 6 या दरम्यान स्नेहदीप, पहाडी रोड नं. 2, आरे मार्ग, गोरेगाव (पूर्व) या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे.  त्यानंतर शिवधाम स्‍मशानभूमी, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व) येथे त्यांच्यावर अंत्‍यसंस्‍कार होतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.