चार दिवसांपासून अचानक ओबीसी नेते देखील बोलायला लागले; पुण्यात जनआक्रोश मोर्चाआधी मनोज जरांगे पा
Marathi January 05, 2025 04:25 PM

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ काल परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चा काढण्यात आला होता. तर आज पुण्यात सकल मराठा समाजानं जनआक्रोष मोर्चाची हाक दिली आहे. पुणे आणि मुंबईत हा मोर्चा निघणार आहे. पुण्यातील लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आज हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित राहणार आहेत. या मोर्चासाठी मनोज जरांगे पुण्यात दाखल झाले आहेत, यावेळी एबीपी माझाशी संवाद साधताना जरांगे यांनी आरोपी कोणत्याही जातीचा असला तरी त्याला फाशी मिळायला हवी असं म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणालेत जरांगे पाटील?

त्याचबरोबर आज त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष केलं आहे. धनंजय मुंडे शहाणा हो, मुख्यमंत्र्यांनी त्यांना आवरावं नाहीतर आम्ही थांबणार नाही. आमचे लोकं तुला अडकवतील, ज्या मराठ्यांनी वाचवलं त्यावर तुम्ही पलटला आहात, प्रतिमोर्चे काढले तर आम्ही देखील तसंच उत्तर देवू, आम्ही देखील मोर्चाने उत्तर देवू, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्याच्या शब्दावरती मराठे शांत…

संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या केली. राज्य यांना कुठं न्यायचं आहे. राज्यभर मराठे मोर्चे काढू. हा खून आमच्या जिव्हारी लागला आहे. आता मी थेट मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे, त्यांना जातीय तेढ निर्माण करायची आहे, सरकारमध्ये राहून यांना जातीय तेढ निर्माण करायचा आहे. मुख्यमंत्र्याच्या शब्दावरती मराठे शांत आहेत. हे लोकं आम्हाला खुप त्रास देत आहेत. एकही आरोपी सुटला तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना धोका दिला असा संदेश जाईल, त्यामुळे सर्वांना शिक्षा द्या. आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत, मुंडेंनी हे सगळं थांबवावं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.

आरोपी कोणत्याही जातीचा असला तरी त्याला फाशी द्यावी, असं मोठं वक्तव्य त्यांनी केला आहे. बीड मधील संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केले आहे. आरोपी कोणत्याही जातीचा असला तरी त्याला फाशी मिळायला हवी, असं जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. चार दिवसांपासून अचानक ओबीसी नेते देखील बोलायला लागल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.  फोन करून ओबीसी नेत्यांना बोलायला लावलं जातंय असा दावा देखील मनोज जरांगे यांनी केलं आहे.

आरोपींना सोबत घेऊन नेमकं पळालं कोण

या प्रकरणातील इतर जे आरोपी आहेत, ते पकडले गेले पाहिजेत. खंडणीतील आरोपी आणि हत्येतील आरोपी एकच आहेत. त्यामुळे यांना सगळ्यांना 302 कलमाखाली घेतलं पाहिजे. त्याचबरोबर या आरोपींना सोबत घेऊन नेमकं पळालं कोण, त्यांना कोणी सांभाळलं. इतकी क्रूरपणे हत्या झालेली असताना त्यांच्यात जातीच्या पलीकडे काही दया मया राहिलेली नाही का? त्यांना फक्त जातीयवाद आणि जातच दिसते का असा सवाल देखील त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला आहे.

तुमच्यातली माणुसकी जिवंत असायला हवी, ते आरोपींना घेऊन पळत आहेत. ते त्यांना सांभाळत आहेत. किती दिवस असे संदेश राज्याला दिले जाणार आहेत, या प्रकरणात कोण मंत्री आहेत या प्रश्नावर उत्तर देताना जरांगे म्हणाले, धनंजय मुंडे आणि दुसरं कोण असणार, आत्तापर्यंत चार दिवसात एकही ओबीसीचा नेता या प्रकरणावर बोलत नव्हता, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबासोबत दुःखात सहभागी होते आणि अचानकच गेल्या चार दिवसापासून बोलायला लागले, ते ओबीसीचे नेते आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जातंय, असेही त्यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. आरोपी कोणत्याही जातीचा असो जातीच्या लोकांनी त्याला पाठबळ द्यायची काय गरज आहे, त्या आरोपीला पाठीशी घालायची गरज काय आहे. तुमचा नेता तुमच्या जवळचा कार्यकर्ता खंडणीत सापडलाय गुन्ह्यात सापडलाय तर त्यावर त्याला वाटवायची काय गरज आहे, असंही जरांगेंनी यावेळी म्हटलं आहे.

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.