शिवसेना नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी सौ.मेघना गजानन कीर्तिकर यांचे रविवार दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ३.३० वाजता वयाच्या ८२व्या वर्षी अल्पश: आजाराने दु:खद निधन झाले.
Maharashtra Live Update: आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू सुमित गुट्टे पुण्यातून बेपत्तागंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू सुमित गुट्टे पुण्यातून बेपत्ता. पिंपळे निलख येथे त्यांच्या निवासस्थानातून सुमित हा 31 तारखेला सकाळी हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो म्हणून गेला असून अद्यापही तो घरी परत आला नाही.
Maharashtra Live Update: लक्ष्मण हाके यांची मनोज जरांगे यांच्यावर टीकालक्ष्मण हाके यांची मनोज जरांगे यांच्यावर टीका
जरांगे घुसायची भाषा आम्हाला करू नका
तुमच्यात दम असेल तर कुठे घुसायचं ते सांगा
अशी चितवणीखोर वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा
अन्यथा दोन समाजात अराजकता निर्माण होईल
सरकारी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र ठप्प,बारदाना नसल्याने खरेदीला लागला 17 दिवसापासून ब्रेकसोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरू केलेली हमीभाव खरेदी केंद्र ठप्प आहेत. बारदाना उपलब्ध नसल्याने खरेदी केंद्र गेली 17 दिवसापासून बंद आहे.दरम्यान जुना बारदाना वापरता येईल का याबाबत विचार सुरू आहे तर नविन टेंडर प्रक्रिया देखील करण्यात आली असुन पुढील दोन तिन दिवसात बारदाना उपलब्ध होईल अशी अपेक्षा असुन खरेदीसाठी 45 दिवस वाढवावे अशी पणन मंञ्याकडे विनंती केली असुन नोंदणी केलेल्या शेवटच्या शेतकऱ्याचे सोयाबीन विकत घेतल जाव यासाठी आपला प्रयत्न असल्याची माहिती आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिलीय.
Nagpur : गोरेवाडा रेस्क्यू सेंटर मधील तीन वाघ, एका बिबट्याचा मृत्यू- गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील तीन वाघ आणि एका बिबट्याचा H5N1 (बर्ड फ्ल्यू)ने मृत्यू झाल्याचा खळबळजनक अहवाल भोपाळ येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेने दिलाय..
- हे तिन्ही वाघ चंद्रपूरच्या सेंटर मधून उपचार घेत असताना गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात आले होते...
crime News : बदलापूरमधील कुख्यात गुंड महेंद्र उर्फ पप्पू बागुलला अटकबदलापूरमधील कुख्यात गुंड महेंद्र उर्फ पप्पू बागुल हा उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाच्या हाती लागला आहे. त्याच्याकडून एक रिव्हाल्वर आणि सहा जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे, हे रिव्हाल्वर ऑर्डनर्स फॅक्टरी मध्ये बनलेले आहे,बदलापूर मधील शनी नगर येथे कुख्यात गुंड अग्निशस्त्रासह फिरत असल्याची गुप्त माहिती उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस शिपाई पिंट्या थोरवे यांना मिळाली होती, त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून पप्पू ला अटक केली.
Maharashtra Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यभरातील सात उड्डाणपुलाचे लोकार्पण करणारनागपूरतील गोधनी रेल्वे स्थानक, वर्धात सिंदी रेल्वे स्थानक, अमरावतीतील चांदुर रेल्वे स्थानक, चंद्रपुरातील बाबुल पेठ फाटक, धुळे येथील दोंडाई शहरातील रेल्वे फाटक, जळगाव येथील स्थानिक आणि वाशिम रेल्वे स्थानकाजवळ अशा सात उड्डाणपुलाचे लोकार्पण होणार ..
Palghar News : जव्हारमध्ये तीन दिवसांत दोन गर्भवती महिलांचा मृत्यूपालघरच्या जव्हार मोखाडा परिसरात पुन्हा एकदा बालमृत्यू आणि माता मृत्यूने डोकं वर काढलं असून मागील तीन दिवसात दोन गर्भवती माता तर एक गर्भाशयातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या घटनासमोर आल्या आहेत . वेळेत उपचार न मिळणे हे मृत्यू झाल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर पालघरचे खासदार हेमंत सवरा यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाची एक बैठक पार पडली . या बैठकीला पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील उपस्थित होते . ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात तसच राज्य सरकारच्या अख्यारीत असलेल्या काही उपाययोजनांसाठी आम्ही पाठपुरावा करू अस आश्वासन यावेळी खासदार हेमंत सावरा यांनी दिलं.
Nashik News : मालेगाव शहरात धुळीचे साम्राज्य,नागरीकांचे आरोग्य धोक्यातनाशिकच्या मालेगाव शहर व परिसरात सुरु असलेल्या रस्ते विकास कामांमुळे शहरात धुळीचे प्रमाण वाढले आहे.रस्त्यांची काम संथ गतीने सुरू असल्याने मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे,यामुळे अनेक नागरीकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागले आहे,संध्याकाळच्या सुमारास नागरिकांना या धुळीतून मार्गक्रमण करावे लागत असल्याने रस्त्यांची काम तातडीने करावी अशी मागणी नागरीकां कडून होत आहे.
koyna dam earthquake : कोयना धरण परीसरात भूकंपाचा सौम्य धक्कासकाळी 6 वाजून 57 मिनिटांनी बसला भूकंपाचा धक्का...
2 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाची शक्यता..
धरणाचा पूर्वेकडील परीसरात जाणवला भूकंप...
कोणतीही जीवितहानी नाही..
पहाटेचा भूकंपाने 1967 साली घडलेल्या महप्रलायकरी भूकंपाचा आठवणी जाग्या .
भूकंपाने कोयना धरणाला धोका नाही.धरण सुरक्षित.
Pune News : मराठा समाजाकडून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चाSantosh Deshmukh Case : संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी, तसेच या घटनांचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार
लाल महाल येथून रविवारी सकाळी नऊच्या सुमारास मोर्चाचा प्रारंभ होणार आहे. लाल महाल, फडके हौद चौक, खडीचे मैदान चौक, १५ ऑगस्ट चौक, लडकत पेट्रोल पंप, नरपतगिरी चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, नेहरू रस्ता, गणेश रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार
Mumbai Crime News : घाटकोपरमधून १३ बांगलादेशींना अटकमुंबईच्या घाटकोपर पोलिसानी आज तब्बल १३ बांगलादेशी नागरिक अटक केले आहेत. हे सर्व १३ आरोपी नालासोपारा च्या अचोले विभागात अनधिकृतपणे राहत होते. गेल्या महिन्यात घाटकोपर पोलिसानी मोहम्मद अली अहमद मिया शेख या बांगलादेशी आरोपीला गोपनीय माहिती च्या आधारे अटक केली होती. यात मिळालेल्या माहितीच्या आधारे तैबूर अजगर शेख, आलम अजगर शेख, मिजानू सलाम शेख, अब्दुल सिराज शेख,मुराद मिजानूर शेख, रत्ना तैबुर शेख,अमीना मुराद शेख,सबिना अब्दुला शेख, कोहिनूर मिजानूर शेख यांच्यासह चार अल्पवयीन मुले अश्या तेरा जणाना अटक केली आहे. हे बांगलादेशी अनधिकृतपणे भारताचा सीमा ओलांडून पश्चिम बंगाल मार्गने भारतात आले आहेत. त्यांच्याकडून आणखी मोठ्या प्रमाणात बांगलादेशी ची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांना आहे.
Bharat Gogawale News : महाड अपघात प्रकरणातील मृतांना पाच लाखांची मदत - मंत्री भरत गोगावले यांनी दिली माहितीमुंबई गोवा महामार्गावरील वीर गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यु झाला होता. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये मदत दिली जाणार असल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे याबाबत आपण मागणी केली असुन त्याला तातडीने मंजुर दिली असल्याचे गोगावले म्हणाले. रात्री उशिरा गोगावले यांनी मृतांच्या घरी जाऊन नातेवाईकांच सांत्वन केल. त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या अपघातानंतर ग्रामिण भागातील रुग्णालयांमधुन मिळणाऱ्या उपचारा बाबत संताप व्यक्त होत असून शासकिय रुग्णालयांमधुन मिळणाऱ्या उपचारांमध्ये अमुलाग्रह बदल घडवुन अडीअडचणी दुर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केल आहे.
Navi Mumbai Crime News : 3 वर्षीय मुलीवर बापानेच केले लैंगिक अत्याचार, नराधम बापाला अटकघणसोली विभागात बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आलेय. 3 वर्षाच्या पोटच्या मुलीवर तिच्याच वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. पीडित मुलीच्या आईला सदर बाब लक्षात येताच तिने पोलीस ठाणे गाठत नराधम बापा विरोधात फिर्याद नोंदवली. रबाळे पोलीसांनी याप्रकरणी पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करत नराधम बापाला अटक केली असून अधिक तपास करण्यात येतोय.
pandharpur News : पंढरपुरात विठ्ठल दर्शनाचा काळाबाजार उघडपैसे घेऊन वशिल्याने दर्शन देणाऱ्या तोतया पुजारी चिंतामणी उत्पात याच्यावर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. विठ्ठलाचा पूजारी आहे असं सांगून पालघरच्या कुणाल घरत या भाविकांकडून विठ्ठल दर्शनासाठी 11 हजार रूपये घेतल्याचे उघड झालेय. मंदिरातील पोलिस अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे पैसे घेऊन वशिल्याचे दर्शन देणारा ठग पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.