(Students from Jalana) रायगड : महाबळेश्वरला सहलीसाठी आलेल्या जालन्यातील 18 विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली. यामध्ये 10 विद्यार्थिनींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. (18 students from Jalna who came on a trip to Mahabaleshwar fell ill)
डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात वातावारण आल्हाददायक असल्याने शाळा आणि महाविद्यालयाच्या सहलींचे आयोजन या कालवाधीत करण्यात येते. महाराष्ट्रातील अनेक शाळा सहलींसाठी महाबळेश्वर, रायगडसह कोकणाला पसंती देतात. रायगड किल्ला, चवदार तळे, नरवीर तानाजी मालुसरे स्मारक दाखविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना आणले जाते. न्यू हायस्कूल वरुळ, घाटवड, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना या शाळेची सहलदेखील सिद्धटेक बारामती मोरगाव, जेजुरी, नारायणपूर, महाबळेश्वर येथून पोलादपूरकडे येत असताना बसमधील 18 विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली. या सर्व विद्यार्थ्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
– Advertisement –
हेही वाचा – Sanjay Raut About Fadnavis : फडणवीस यांचे कौतुक थांबेना, काय म्हणाले संजय राऊत?
महाबळेश्वर येथे विद्यार्थ्यांनी शीतपेय तसेच तेलकट खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला, असे शाळेचे शिक्षक प्रकाश बंसीधर मस्तीके यांनी सांगितले. त्यातच, महाबळेश्वर ते पोलादपूर या प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी गार वाऱ्यामुळे खिडक्या बंद केल्याने त्यांचा श्वास कोंडला असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. हे विद्यार्थी 9 ते 16 वर्षे वयोगटातील आहेत.
– Advertisement –
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव, महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक शंतनू डोईफोडे, लहान मुलांचे डॉक्टर पुल्ले, डॉक्टर अनिल काकड, डॉक्टर गुठठे, डॉक्टर राजेश शिंदे यांसह पोलादपूर तहसील कार्यालयाचे अधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. मध्यरात्री एक वाजेपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांचे प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाकडून देण्यात आली.
विशाल शेळके (9 वर्षं), पायल परिहार (9 वर्षं), संकेत घुले (9 वर्षं), प्रथमेश लाहोरकर (15 वर्षं), शिवानी डोंगरदिले (15 वर्षं), आरती कर्डेल (15 वर्षं), समीक्षा वाकोडे (15 वर्षं), योगिता शेळके (15 वर्षं), आरुषी देवमाने (13 वर्षं), वैष्णवी घायवट (16 वर्षं), ओम घायवट (14 वर्षं), शिवकन्या बर्डे (15 वर्षं), वनिता साळवे (15 वर्षं), श्रावणी देवमाने (15 वर्षं), तुषार कस्तुरे (15 वर्षं), सोहम सोलाट (15 वर्षं) आणि ओम करडे (15 वर्षं) अशी विद्यार्थ्यांची नावे आहेत. (Students from Jalna: 18 students from Jalna who came on a trip to Mahabaleshwar fell ill)
हेही वाचा – Modi Govt : संजय राऊत म्हणतात – नितीश कुमार एनडीएमध्ये राहतील का, याबाबत मला शंका!