Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटीलांच्या विरोधात ओबीसी नेते आक्रमक, दिला हा इशारा
esakal January 06, 2025 02:45 AM

गेल्या काही दिवसांपासून राज्य नव्हे तर देशभर मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चर्चा होताना पाहायला मिळत आहे.सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर ठीकठिकाणी मोर्चे निघताना पाहायला मिळत आहेत.

काल परभणी येथे झालेल्या मोर्चा मध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केलेली पाहायला मिळत आहे.आत्ता यावर ओबीसी नेते हे आक्रमक झाले असून अशी चितवणीखोर वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा अन्यथा दोन समाजात अराजकता निर्माण होईल असा इशारा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दिलं आहे.

यावेळी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांनी घुसायची भाषा आम्हाला करू नका तुमच्यात दम असेल तर कुठे घुसायचं ते सांगा.अशी चितवणीखोर वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा अन्यथा दोन समाजात अराजकता निर्माण होईल असा इशारा यावेळी हाके यांनी दिलं आहे.

तर यावर ओबीसी नेते बाळासाहेब सानप म्हणाले की राज्यात जो जातीय तेढ निर्माण झाला आहे त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.आत्ता मोर्चाला प्रति मोर्चा आणि उत्तर आमच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. जाणूनबुजूनवंजारी समाजाला टार्गेट केले जात आहे अधिकाऱ्यांना टार्गेट केलं जात आहे.राज्यात जातीय तेढ निर्माण होईल असं वक्तव्य पाटील यांनी करू नये अस यावेळी सानप म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.